लग्नसोहळा म्हटलं की मज्जा आलीच. या लग्नामध्ये नवरी आणि नवरदेव दोन्ही पक्षातील नातेवाईक खूप धमाल करत असतात. दोघांसाठी हा आनंदाचा क्षण कायम आयुष्यभर आठवणीत ठेवण्यासारखा असतो. पण लग्नासाठी आपण जे जे प्लानिंग करतो ते सारं काही होईलच असं काही नाही. लग्नात थोड्या जरी गोष्टी इकडच्या तिकडे झाल्या तर मग जो राग अनावर होतो तो पाहण्यासारखा होतो. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. या व्हिडीओमध्ये संतापलेल्या नवरीने रागाच्या भरात ८ लाख रूपयांचे वेडिंग गाऊन कापून टाकले.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ हा चीनमधला आहे. चीनच्या चोंगकिंग शहरात ही घटना घडलीय. कल्पना करा की, लग्नात नवरीला कळलं की तिच्यासाठी तयार केलेला लग्नातला ड्रेस रद्द केलाय आणि ड्रेससाठी दुकानदाराला जो अॅडवान्स दिला होता, तो परत देण्यासाठी नकार देत आहेत, त्यानंतर मात्र नवरीचा जो पारा चढतो तो पाहून तुम्ही अवाक व्हाल. खरं तर हे कळल्यानंतर नवरीचा राग कुणीही समजू शकेल. पण रागाच्या भरात नवरी काय करू शकते याचा कोणीही अंदाज लावू शकत नाही. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये एका वेड्या महिलेने ब्रायडल सलूनमध्ये जाऊन वेडिंग गाऊन एकामागून एक फाडून टाकले. महिलेचं हे वागणं पाहून दुकानदाराने अॅडवान्स रक्कम परत करण्यास नकार दिला.

Shocking video Bride's Mother Cancels Wedding In Bengaluru After Groom's Drunken Misbehaviour video
VIDEO: “लेकीपेक्षा महत्त्वाचं काहीच नाही” लग्नात दारु पिऊन पोहोचला नवरदेव; नवरीच्या आईनं भर मांडवात काय केलं पाहा
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
True love Viral Video
‘बायको, तू फक्त साथ दे..’ खऱ्या प्रेमाचं उदाहरण दाखविणारा सुंदर VIDEO एकदा पाहाच…
Shocking Video
Video : तुफान राडा! दोन तरुणी भिडल्या अन् एकमेकींच्या झिंज्या उपटल्या, व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले, “बॉयफ्रेंडसाठी..”
what is marriage a child told funny answer
Video : “लग्न म्हणजे काय?” चिमुकल्याने स्पष्टच सांगितले, “घोड्यावर बसून केलेला गाढवपणा” मजेशीर व्हिडीओ होतोय व्हायरल
Groom dance with mother in his haldi on khandeshi song video goes viral on social media
“आये कर मन लगन” नवरदेवानं बायकोसोबत नाहीतर आईसोबत धरला खानदेशी ठेका; VIDEO झाला व्हायरल
Emotional video of grandfather during granddaughter wedding video viral on social media
“लग्नात सगळ्या इच्छा पूर्ण झाल्या पण…”, नात आणि आजोबांचा ‘हा’ VIDEO पाहून तुमच्याही डोळ्यात येईल पाणी
Wedding video groom denies chain from father in law during marriage viral video on social media
जावई नंबर १! भरलग्नात नवरदेवाने सासऱ्यांचा आग्रह नाकारला, ‘ती’ गोष्ट घेण्यास दिला नकार, VIDEO मध्ये पाहा नेमकं काय घडलं

आणखी वाचा : VIRAL VIDEO : एकत्र बसून खोलीत आराम करत होते, तेवढ्यात कोसळला छताचा पंखा

जियांग असं या महिलेचं नाव आहे. ही घटना ९ जानेवारी रोजी घडली होती. जियांगने $११,००० (८,१२,०६३ रुपये) किमतीचे ३२ वेडिंग गाऊन खराब केले. या महिलेने $१,२५० (रु. ९२,८१३) किंमतीचे पॅकेज रद्द केलं म्हणून दुकानदाराने $५५० (रु. ४०,८३७) किमतीची आगाऊ रक्कम परत करण्यास नकार दिला.

आणखी वाचा : नवरा पलंगावर आरामात झोपला होता, पत्नीने जे केलं ते पाहून त्याची झोपच उडाली, पाहा Viral Video

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

चिनी सोशल मीडिया नेटवर्क्स वीबो आणि ट्विटरद्वारे पोस्ट केलेल्या व्हिडीओमध्ये एक संतप्त महिला ब्रायडल शॉपमध्ये गोंधळ घालताना दिसून आली आहे. लागोपाठ ही महिला न थांबता एकामागून एक कपडे कापताना दिसतेय. हा व्हिडीओ रेकॉर्ड करणारी महिला या संतप्त नवरीला आवरताना दिसून येतेय. ‘जरा विचार करा, या कपड्यांची किंमत अनेक हजार युआन (चीनी चलन) आहे!’

आणखी वाचा : मुंबईच्या लोकल ट्रेनमधली ‘पुष्पा’ स्टाईल तुम्ही पाहिलीय का? श्रीवल्ली हुक स्टेपचा रिक्रिएट VIRAL VIDEO एकदा पाहाच

यावर वधू बेफिकीरपणे उत्तर देते, ‘हजारो? यांची किंमत दहा हजार पण असू शकते, पण हे योग्य आहे. जियांगने दुकानातील सर्व कपड्यांचा ढीग तर उध्वस्त केलाच, पण १,५०० डॉलर्सचे लाल आणि सोनेरी रंगाचे पारंपारिक चिनी वेडिंग गाऊनही पूर्णपणे नष्ट केले.

Story img Loader