Wedding Viral Video: सध्या सर्वत्र लग्नसराईचा हंगाम सुरू आहे. सोशल मीडियावरही लग्नासंबधित अनेक वेगवेगळे व्हिडीओ पाहायला मिळत आहेत. लग्नात नवरा- नवरीच्या एन्ट्री पासून ते वरातीत होणाऱ्या डान्सचे व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असतात. नुकताच असाच एक लग्न मंडपातील व्हिडिओ सोशल मीडियावर आला आहे, जो प्रचंड चर्चेचा विषय बनला आहे. पण ही चर्चा नवरा किंवा नवरीची नसून एका बैलाची आहे. जो लग्नमंडपात घुसला होता.

बैल लग्नमंडपात घुसला

व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की एका बैलाने लग्नमंडपात प्रवेश केला आहे. हा बैल इकडून तिकडून सतत पळताना दिसत आहे. बैल थेट लग्नमंडपात घुसताच जमलेल्या पाहुण्यांची तारांबळ उडाली आहे. त्यातला एकजण बैलाला हकलवण्याचा प्रयत्न करतो मात्र तो बैल त्याच्या अंगावर धावून येतो. त्यानंतर स्वतःच हा बैल मंडपाच्या बाहेर जाताना दिसत आहे. मिळालेल्या माहितीनुसार या लग्नसमारंभात बैल घुसल्याने कोणालाही हानी झाली नाही आहे. मात्र बैलाने घातलेल्या धुडगूस मुळे काहीवेळासाठी मंडप रिकामी करावा लागला आहे.

( हे ही वाचा: Video: खरंच राजाच म्हणावं लागेल ‘या’ सिंहाला! समोर आलेल्या श्वानावर हल्ला न करता त्याचे चुंबन घेतले अन…)

येथे पाहा व्हिडिओ

( हे ही वाचा: Video: नकली पोशाख घालून ‘तो’ चक्क मगरीजवळ जाऊन झोपला; तिचा पाय ओढला अन् तितक्यात…अंगावर काटा आणेल ‘हा’ क्षण)

हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून याला असंख्य व्ह्यूज मिळाले आहेत. तसंच अनेक प्लॅटफॉर्मवर हा व्हिडिओ शेअर केला जात आहे. नरेंद्र सिंह नावाच्या युजरने हा व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला आहे. या व्हिडिओला अनेक लाईक्सही मिळाले असून लोकं यावर आपल्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.

Story img Loader