शांत प्राणी म्हणून गायीचे नाव घेतले जाते. गायीने एखाद्यावर आक्रमकपण हल्ला केल्याचे आपल्याला फार क्वचितच पाहायला मिळाले असेल, मात्र गायीला जेव्हा त्रास दिला जातो तेव्हा ती कसलाही विचार न करता एखाद्यावर आक्रमकपणे हल्ला करते. अशाचप्रकारे एका गायीला क्रुरतेची वागणूक दिल्याच्या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यात एक आक्रमक गाय त्रास देणाऱ्या व्यक्तीलाअसा काही धडा शिकवते जो ती व्यक्ती कायमचा लक्षात ठेवेल. यावेळी आजूबाजूचे लोकही गायीचे हे आक्रमक रुप पाहून थक्क झाले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

व्हायरल झालेल्या एका व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक व्यक्ती गायीला पकडण्याचा प्रयत्न करत आहे. यावेळी गाय जुमानत नसल्याने त्या व्यक्तीने तिला लाथेने मारहाण केली. पण तरीही गायीने त्याचे ऐकले नाही, तेव्हा त्या व्यक्तीने तिची शेपटी रागाने गोल-गोल पिरगळून पकडली, यावेळी त्याला वाटले शेपटीला पकडून गाय आपल्या नियंत्रणात येईल, पण तसे झाले नाही. गाईच्या मनात यावेळी काहीतरी वेगळंच सुरु होते. तो व्यक्तीला गायीची शेपटी पकडून तिला त्रास देतच राहिला. यावेळी गायही खूप चिडली आणि तिने आपली शेपटी सोडवून घेत त्या व्यक्तीवर जोरदार हल्ला केला.

हेही वाचा : अवघड आहे राव! आता धावत्या ट्रेनमध्ये सुरु झाला पाणीपुरी विक्रीचा धंदा; खाण्यासाठी प्रवासी उभे; पाहा Viral Video

संतप्त गायीने शिकवला धडा

गायीने मारणाऱ्या व्यक्तीवर केलेला हल्ला पाहून तिथे उपस्थित लोकही खूप घाबरले. गायीने आधी हल्ला करणाऱ्या व्यक्तीला जमिनीवर आपटले, त्यानंतर त्याला लाथांनी तुडवत शिगांनी हल्ला केला, यादरम्यान ती व्यक्ती स्वत:चा जीव वाचवतानाही दिसली. पण संतापलेल्या गायीने त्याला इतक्या सहजासहजी सोडले नाही. जेव्हा तो व्यक्ती पळून जाण्याचा प्रयत्न करू लागला तेव्हा गायीनेही त्याला ओढत अंगावर पाय ठेवत त्याला ओरबाडले. या घटनेदरम्यान आजूबाजूचे लोक आरडाओरड करताना दिसले. गायीचे हे आक्रमक रुप पाहून त्या व्यक्तीला वाचवण्याचे धाडस कोणाचेच झाले नाही.

@ExtremeFaiIs नावाच्या ट्विटर अकाउंटवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत १३ लाखांहून अधिक व्ह्यूज आले आहेत. ही घटना पाहणाऱ्या युजर्सनी गायीची कृती योग्य असल्याचे सांगितले आहे. एका युजरने म्हटले की, ‘प्राण्यांवर कोणत्याही प्रकारे गैरवर्तन केले जाऊ नये.’ तर दुसऱ्या युजरने म्हटले की, ‘मला खूप आनंद झाला की. या माणसासोबत हे घडले’. तर तिसऱ्या एका युजरने म्हटले की, ‘गायीने त्याला त्याची खरी जागा दाखवून दिली.’