आज जवळपास प्रत्येक घरात वीज आलेली आहे. वि‍जेवर चालणार्‍या अनेक उपकरणांचा सर्रासपणे वापर गेला जात आहे काही वेळासाठी वीज गेली तरी लोकांची खूप गैरसोय होते. मिक्सर, फ्रिज, टिव्ही मोबाईल, पंखा एसी अशी कित्येक विद्युत उपकरणे विजेशिवाय चालू शकत नाही आणि या उपकराणांशिवाय अनेक काम पूर्ण होत नाही. वेळच्या वेळी वीज बील भरूनही वारंवार वीज पुरवठा खंडीत होत असल्याने अनेक महावितरणचे ग्राहक त्रस्त झाले आहे.

रात्रभर वीज पुरवठा बंद, संतापलेल्या ग्राहकांनी व्यक्त केली नाराजी

गेल्या काही दिवसांपासून पावसामुळे अनेकदा वीज पुरवठा खंडीत होत आहे. रात्रभर वीज पुरवठा बंद असल्यामुळे वैतागलेल्या कुटुंबाने हटके पद्धतीने नाराजी व्यक्त केली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओ पाहून तुम्ही पोट धरून हसाल. अनेक ग्राहकांनी या कुटुंबाच्या कृतीचे समर्थन केले.

Shocking video Man beat up girlfriend on road video goes viral on social media
“हे कसलं प्रेम? घरी आई-वडिलांचा एक शब्दही ऐकून न घेणाऱ्या मुली बॉयफ्रेंडचा मार कसा खातात?” धक्कादायक VIDEO व्हायरल
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Suresh Dhas On Santosh Deshmukh
Suresh Dhas : “आका हा सोपा आका नाही, ठराविक लोकांना प्रत्येक महिन्याला…”, आमदार सुरेश धस यांचा गंभीर आरोप
Bull attack on woman
‘त्याने थेट महिलेला उडवलं…’ धक्कादायक घटनेचा VIDEO पाहून अंगावर येईल काटा
Shocking video pune A Guy in Car attacked by 3 Youths on Scooter Pune street video goes viral
पुण्यात गुंडगीरी संपेना; कार चालकाचा पाठलाग केला शिवीगाळ केली अन्…VIDEO पाहून तुम्हीच सांगा या तरुणांचं करायचं काय?
Shocking video MP: Fraudsters Replace QR Codes Of Several Shopkeepers To Redirect Payment In Their Bank Accounts In Khajuraho
तुम्हीही सगळीकडे QR कोडने पेमेंट करता का? वेळीच सावध व्हा; फसवणुकीचा हा Video पाहून दुकानदारांच्या पायाखालची जमीन सरकेल
Shocking video man caught stealing bra panties in Bhopal video goes viral
बापरे आता तर हद्दच पार केली! चोर आला महिलांचे वाळत घातलेले अंतर्वस्त्र घेतले अन्…VIDEO पाहून येईल संताप
kids anger issues
तुमची मुलंही सतत रागावतात, चिडचिड करतात? मग ‘या’ सोप्या उपायांनी मिळवा नियंत्रण

हेही वाचा – “माणसांना पंख असते तर…? चिमुकल्याच्या ‘या’ निबंधाला तुम्ही किती मार्क्स द्याल? Viral Photo पाहून पोट धरून हसाल

मिक्सर आणि चार्जर घेऊन थेट महावितरणा कार्यलय गाठले

व्हायरल व्हिडिओ अमरावतीमधील आहे. रात्रभर वीज पुरवठा बंद असल्यामुळे वैतागलेल्या कुटुंबाने थेट महावितरण कार्यालयात जाऊन नाराजी व्यक्त केली. मिक्सर आणि मोबाईल चार्जर घेऊन हे ग्राहक महावितरण कार्यालयात पोहचले.

काय आहे व्हायरल व्हिडीओ

इस्टाग्रामवर kotthiikr_official नावाच्या खात्यावर हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये पाहू शकता की एक महिला महावितरण कार्यलयात मिक्सर वापरताना दिसत आहे तर एक मुलगा मोबाईल चार्ज करत आहे. महावितरणाच्या कार्याबद्दल नाराजी व्यक्त करण्यासाठी या कुटुंबाने हटके पद्धत शोधली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. व्हिडिओ पाहून वीजपुरवठा खंडीत होण्याच्या त्रासाला वैतागलेल्या अनेकांनी या कुटुंबाच्या कृतीचे समर्थन केले आहे. व्हिडीओव कमेंट करताना एकाने लिहिले की, “अगदी बरोबर केलं आणि सगळ्यांनीच हेच केलं पाहिजे.”

हेही वाचा – “हौसेने आणली ती चारचाकी घरी पण मायबाय रस्त्यावरी…” हरिनाम जपत तरुणाने गायलं भन्नाट मराठी रॅप! Viral Video एकदा बघाच

दुसरा म्हणाला, “वाढीव वीज बिल आकारून देखील सेवा देत नाही, अगदी बरोबर केलं तुम्ही”

तिसरा गंमतीने म्हणाला,”तुमच्या मागोमाग मी टिव्ही घेऊन येतो”

Story img Loader