वास्तविक, हत्तींचे अनेक व्हिडिओ व्हायरल होतात, ज्यामध्ये आपण त्यांना मजेशीर गोष्टी करताना दिसतात. पण आता एक हृदयात धडकी भरवणारा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये दिसते की एका हत्तीने पर्यटकांच्या वाहनावर हत्तीने केला हल्ला आहे. जंगल सफारी करताना हत्तीच्या जवळ जाणे पर्यटकांना चांगलेच महागात पडले आहे.

इंस्टाग्राम वापरकर्ता माइक होल्स्टनने व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडीओ एखाद्या अभयारण्यातील असल्याचा अंदाज आहे. व्हिडीओच्या सुरुवातीला तुम्ही बघू शकता की, रस्त्याच्या कडेला एक गाडी उभी आहे आणि त्याच्या समोर एक मोठा हत्ती आहे. गाडीमध्ये काही लोकही बसलेले दिसत आहे. काही वेळातच हा गजराज गाडीवर हल्ला करून ते पाडण्याचा प्रयत्न करतो. हत्ती आपली सर्व शक्ती कशी वापरून मोठी गाडी हवेत उचलली आणि जोरात जमिनीवर आपटली आहे. गाडीतील लोक ओरडू लागतात आणि मग हत्ती क्षणभर गाडी मागे हटतो. वाहनचालक त्वरित गाडी मागे घेतो. हत्ती मागे गेल्याने मोठा अपघातापासून पर्यटक थोडक्यात बचावले आहेत.

Tiger effortlessly jumps across the river with a single leap Tiger Crossing River By Jump Animal Video
जिथं भीती संपते तिथं आयुष्य सुरु होतं! जंगलाच्या राजाचा ‘हा’ VIDEO पाहून कळेल आयुष्य कसं जगायचं
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले…
Case against Sarafa, elephant hair jewellery,
हत्तीच्या केसांचे दागिने विकणाऱ्या पुण्यातील सराफाविरुद्ध गुन्हा, वन्यजीव कायद्यान्वये कारवाई
two wheeler accident
पुणे: फटाक्यांच्या धूरामुळे गंभीर अपघात, दोन दुचाकींची समोरासमोर धडक; अपघातात चौघे जण जखमी
Uttarakhand Bus Accident News
Uttarakhand Bus Accident : उत्तराखंडच्या अल्मोडा दरीत बस कोसळून २३ प्रवाशांचा मृत्यू, अनेक प्रवासी गंभीर जखमी
Viral Video: Family Throws Gas Cylinder at Neighbours Over Excessive Firecracker Noise shocking video
“क्षणभराचा राग अन् आयुष्यभर पश्चाताप” फटाके फोडण्यावरून शेजारी भिडले, थेट छतावरून सिलेंडर फेकला; VIDEO व्हायरल
Leopard's tactics for monkey hunting
युक्तीने साधला डाव! माकडाच्या शिकारीसाठी बिबट्याचा डावपेच; VIDEO पाहून अंगावर येईल काटा
kudo millets elephants death
‘कोदो मिलेट’च्या सेवनाने तीन दिवसांत १० हत्तींचा मृत्यू; कारण काय? काय आहे कोदो मिलेट?

सफारी मार्गदर्शक बोंगानी येंडे यांच्या प्रसंगवधान आणि शौर्याने त्यांना आणि पर्यटकांना संतप्त हत्तीच्या संभाव्य प्राणघातक हल्ल्यापासून वाचवले. दक्षिण आफ्रिकेच्या पिलानेसबर्ग गेम रिझर्व्हमधील रॅथलोगो बर्ड हाइड येथील व्हिडीओ असल्याचे समजते आहे. पर्यटकांसाठी पार्किंगचे ठिकाण शोध असताना येंडे यांना एक मोठा हत्ती जवळ येताना दिसला. या नर हत्तींमध्ये वाढलेल्या आक्रमकता त्यांनी ओळखली होती. धोका ओळखून येंडे यांनी वेगाने चार पर्यटकांना गाडीत बसवले तर इतर लपून बसले. थोडा वेळ शिल्लक असताना, येंडेने आपल्या पर्यटकांचे रक्षण करण्यासाठी हत्तीचा सामना करण्याचा निर्णय घेतला. हत्तीला घाबरवण्याच्या प्रयत्नात गाडी चालवण्याचा प्रयत्न केला पण हत्तीने हलण्यास नकार दिला.

हेही वाचा – झोपण्यासाठी फक्त ४ तास, JEE परिक्षेची तयार करणाऱ्या विद्यार्थ्याचे वेळापत्रक पाहून जेईईच्या उमेदवारांना धक्का बसेल

हत्तीने शेवटी वाहनाला आव्हान दिल्याने तणावपूर्ण स्थिती निर्माण झाली. आपल्या दांताचा वापर करून, हत्तीने सहजतेने जीप जमिनीवरून उचलून धरली, समोरचे टायर त्याच्या डोक्याच्या उंचीपर्यंत पोहोचले होते. वाहन हवेत उंचावल्याने आतमधील पर्यटक घाबरून गेले. जीवाच्या भीतीने ते ओरडले.

जीप खाली आपटल्यानंतर, हत्ती शेवटी दूर गेला, पण गाईड आणि पर्यटकांना हादरवून सोडले. सुदैवाने त्यांना कोणतीही हानी पोहचली नाही..या घटनेचा मुळ व्हिडीओ Eldine Arendse यांनी एका युट्युब चॅनेलसह शेअर केला आहे. अशा दबावाच्या परिस्थितीत गाईड बोंगानी येंडे यांच्या धाडसी कृती आणि संयमाने संभाव्य अपघात टळला. ऑनलाइन पोस्ट केल्यापासून, व्हिडिओ ९० लाखांपेक्षा जास्त लोकांनी पाहिला आहे आणि तुफान व्हायरल झाला आहे.

हेही वाचा – चक्क सोंडेने चित्र काढतोय हा हत्ती! निसर्गाचे सुंदर चित्र पाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही, Video Viral

व्हिडीओ पाहून क्षणभर अंगावर काटा येत आहे. व्हिडीओवर कमेट करताना लोकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. एकाने लिहले की, भाऊ त्याचे दात किती मजबूत आहे. दुसरा म्हणाला, हे प्राण्यांच्या निवासाचे सन्मान करण्याचा संकते देत आहे. तिसरा म्हणाला, “अरे यार, हत्ती चक्क माणसांनी भरलेले कार उचलत आहे” चौथा म्हणाला, “मला माहित नाही पण ६००० पाऊंड वजनाच्या प्राण्याच्या इतके जवळ जाऊ नये आणि त्यांना शांततेत राहू द्या.” पाचव्याने सुचवले, “हा इशारा आहे. त्यांना एकटे सोडा.” सहाव्याने लिहिले, “माझ्या कोणत्याही सफारीवर असे कधीच घडले नाही. मला याची गरज आहे!” सातव्याने लिहिले, “हत्ती खूप प्रयत्नही करत नव्हता.”