बकरा तसा शांतप्रिय पाणी आहे, पण त्याला कोणी डिवचण्याचा प्रयत्न केला तर तो कोणाला सोडत नाही. त्यामुळे बकऱ्याच्या ताकदीला कमी लेखणे म्हणजे स्वत:चा जीव धोक्यात घालून घेण्यासारखे आहे. कारण अशाच प्रकारे एका व्यक्तीने बकऱ्याला त्रास देण्याचा प्रयत्न केला, पण बकऱ्याने एका मुसंडीत त्याला जमिनीवर लोळवले. या बकऱ्याने एखाद्या ताकदवान पैलवानासारखी चाल खेळत व्यक्तीला धडा शिकवला आहे. सोशल मीडियावर या ताकदवान बकऱ्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.
ज्यात तुम्ही पाहू शकता बकऱ्याला विनाकारण त्रास देणे एका व्यक्तीला किती भारी पडले. यावर काहीजण, त्या व्यक्तीला त्याच्या कृतीचे फळ मिळाले असे म्हणत आहेत. व्हिडीओमध्ये दिसतेय की, एक व्यक्ती बकऱ्याला विनाकारण त्रास देत होता. यावेळी बकरा मान वाकडी तिकडी करत व्यक्तीला हल्लाचा इशारा देत होता. पण त्या माणसाला ते समजले नाही. यावेळी बकऱ्याने एक लांब धाव घेतली आणि व्यक्तीला अशा प्रकारे धडक दिली की तो थेट जाऊन जमिनीवर पडला. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, जो पाहून लोक मोठ्याने हसत आहेत.
यात व्यक्तीने स्वत:हून हे संकट ओढावून घेतले होत. व्हिडीओमध्ये एक व्यक्ती हातात लाल रंगाचा टेबल घेऊन बकऱ्याला डिवचण्याचा प्रयत्न करत असतो. यावेळी बकऱ्याला खूप राग येतो आणि ती त्या व्यक्तीवर हल्ला करतो. या हल्ल्यानंतरही व्यक्ती शांत न राहता एका स्कूटीवर बसून त्याला टेबलने त्रास देत राहतो. यावेळी बकरा त्या व्यक्तीला धडा शिकवण्यासाठी काही पावलं मागे सरते. यावेळी तरुणाला वाटते बकरा शांत झाला आहे. पण घडते उलटेच… बकरा धावत येत व्यक्तीला जोरदार धडक देतो, ज्यामुळे व्यक्ती स्कूटीवरून थेट जमिनीवर कोसळतो. हे पाहून व्हिडिओ शूट करणारी व्यक्तीही जोरजोरात हसायला लागते. या हल्ल्यानंतर व्यक्ती लपण्याचा प्रयत्न करत असते पण बकरा त्याच्या मागे जात पुन्हा हल्ल्याचा प्रयत्न करतो.
ट्विटरवर @RetardedHurt नावाच्या अकाउंटवरून हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. ज्याचा कॅप्शनमध्ये लिहिले की, कर्म! या व्हिडीओसला आत्तापर्यंत २०० हून अधिक लाईक्स मिळाले आहेत. तर अनेक युजर्स यावर वेगवेगळ्या कमेंट्स करत आहेत. एका व्यक्तीने लिहिले की, संकट येत नाही, आपण स्वतः ती ओढावून आणतो. दुसऱ्या युजरने कमेंट केली की, हल्ला करण्यापूर्वी बकरीने अप्रतिम रनअप केला. पण हा व्हिडीओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट्स करुन सांगा.