सोशल मीडियावर लग्न समारंभातील अनेक व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत असतात. ज्यामध्ये नवरा-नवरीचा डान्स असो किंवा पाहुण्यांनी केलेल्या करामती असो. बरेचवेळा लग्नकार्यात घडलेले वाद किंवा भांडण याचे देखील व्हिडीओ सोशल मिडीयावर झपाटयाने व्हायरल होतात. सध्या असाच एक व्हिडीओ चर्चेत आहे, ज्यामध्ये नवऱ्याचा मित्र त्याची वारंवार त्याची छेड काढत असल्याने नवरा त्या मित्राची चांगलीच धुलाई करतो. यामध्ये बाजूला बसलेली नवरी सुद्धा त्याला आवरण्याचा प्रयत्न करते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

नवऱ्याने मित्राला मारहाण केली

व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की नवरा आणि नवरी स्टेजवर बसलेले दिसत आहेत आणि इतर लोकही कार्यक्रमात उपस्थित आहेत. दरम्यान, नवऱ्याचा मित्र त्याच्या खुर्चीच्या मागे उभा राहून त्याची वारंवार छेड काढू लागतो. नवरा आधी शांत राहतो मात्र काही वेळाने त्याचा संयम सुटतो आणि तो मित्राला मारहाण करण्यास सुरुवात करतो. हे पाहून आजूबाजुची लोकही घाबरतात. यावेळी बाजूला बसलेली नवरीही त्याला आवरण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे.

( हे ही वाचा: Video: लग्नमंडपात नवऱ्याची मेव्हणीकडे भलतीच मागणी, म्हणाला “मला ५ किस…”)

( हे ही वाचा: दोन धावत्या गाड्यांमधून अशाप्रकारे बाहेर काढली ‘त्या’ ने स्वतःची कार; जबरदस्त एन्ट्री पाहून नेटकरीही हैराण)

हा व्हिडीओ सोशल मीडियावर @Gulzar_sahab नावाच्या ट्विटर हँडलवर शेअर करण्यात आला आहे. काही सेकंदांचा हा व्हिडिओ दीड लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. यावर नेटिझन्सकडूनही तीव्र प्रतिक्रिया येत आहेत.