सरकारी कार्यालयाच्या अनेकदा खेटा घालूनही आपलं काम होत नसल्याचा अनुभव आपल्याला अनेकदा येतो. सरकारी कार्यालयात दहावेळा फेऱ्या मारल्याशिवाय आपलं काम काही पूर्ण होणार नाही हे जणू आपल्या अंगवळणीच पडलं आहे. तेव्हा अनेकदा सामान्य नागरिकांना सहकार्य न करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या तक्रारी करतो किंवा त्यांच्या कामचुकारपणाचा जाहीर निषेध तरी करतो. पण कदाचित तुम्हाला आता आम्ही जे काही सांगणार आहोत ते वाचून अक्षरश: पोट दुखेपर्यंत तुम्हाला हसू येईल. सरकारी कचेरीत अधिकारी आपल्याकडे दुर्लक्ष करतायत हे पाहून राग अनावर झालेल्या पठ्ठ्याने चक्क पिशवीभरून ढेकूण सरकारी कचेरीत सोडून दिले.

वाचा : गरिबांची तहान भागवण्यासाठी धडपडतोय लंडन रिटर्न ‘मटकामॅन’

एक ढेकूण जरी दिसला तरी आपल्याला अक्षरश: किसळ वाटतो, तिथे शेकडो ढेकूण पाहिल्यावर या कर्मचाऱ्यांचे काय झालं हे वेगळं सांगायला नको. आता एखादं काम केलं नाही तर फारफार तर माणसं चिडताना, रागवताना इथल्या कर्मचाऱ्यांनी पाहिली असतील असा प्रकार एखादा करेल, याची कोणी स्वप्तनातही कल्पना केली नसणार हे नक्की. जॉर्जियामधल्या ऑगस्टा शहरातील सरकारी कचेरीत हा विनोदी प्रकार घडला. या ढेकणांमुळे सगळ्या कर्मचाऱ्यांना इमारत सोडून बाहेर पळावं लागलं. नंतर हा वेडपेणा करणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतलं. गेल्या काही दिवसांपासून त्याच्या घरात ढेकणांचं राज्य आहे. त्याने याबाबत तक्रार करूनही त्याच्या तक्रारीची दखल कर्मचाऱ्यांनी घेतली नाही तेव्हा त्यांना धडा शिकवण्यासाठी त्याने असा प्रकार केला. आता अशा प्रकारामुळे सरकारी कर्मचारी भलेही त्याच्यावर चिडले असले तरी अनेकांना मात्र त्यांची ही कल्पना भन्नाट आवडली.

वाचा : न्याहारीत भारतीयांची ‘या’ पदार्थाला जास्त पसंती

Story img Loader