इंटरनेटवर कधी काय आणि नेमक्या कोणत्या कारणासाठी व्हायरल होईल याचा काही नेम नाही असं म्हटलं जातं. अनेकदा एखाद्या विषय अचानक चर्चेत येतो. मग त्यावर अनेकजण अगदी तुटून पडतात आणि तोच विषय ट्रेण्डींग होतो. तर कधी अचानक एखादा व्हिडिओ हजारोच्या संख्येने शेअर होतो आणि तोच व्हायरल म्हणून ट्रेण्ड होतो. असाच एक व्हिडिओ सध्या व्हायरल होतो असून या व्हिडिओमध्ये रस्त्याच्या बाजूच्या झुडपांमध्ये अश्लील चाळे करताना एका जोडप्याला एका आजीबाईंनी रंगेहाथ पकडलं. त्यानंतर या दोघांनाही या आजीने लाकडाच्या फळीने चांगलाच चोप दिल्याचे पहायला मिळालं. हा व्हिडिओ या आजीच्या शेजारी राहणाऱ्यांनी गॅलरीमधून शूट केल्याचे लॅड बायबल डॉट कॉमने आपल्या वृत्तात म्हटलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ईशान्य रशियामधील स्टाव्हरोपोल येथे हा संपूर्ण प्रकार घडला आहे. एका तरुण जोडप्याला झुडपांमध्ये सेक्स करताना पाहिल्यावर इरिना नावाची महिला चांगलीच संपाली. या मुलांना धडा शिकवण्यासाठी इरिना यांनी या झुडपांकडे जाताना हाती आलेल्या लाकडाच्या फळीनेच दोघांनाही चांगलाच चोप दिला. व्हिडिओमध्ये जोडप्यांचे केवळ पाय दिसत असून त्यांच्या पायांवरच ही महिला लाकडाच्या फळीने फटके मारताना दिसत आहे. आधी मुलाच्या मांडीवर फटके मारल्यानंतर ही महिला जोरात ओरडत मुलीच्या पायावरही फटके मारताना दिसते. दोघांनाही बरेच फटके मारल्यानंतर तिथून निघून जाण्याआधी ही महिला मुलाच्या मांडीवर जोरात लाकडाची फळी मारते की तो मोठ्याने किंकाळतो.

सध्या रशियामध्ये करोनाबाधितांची संख्या मोठ्या प्रमाणात आढळून येत असताना अशाप्रकारे सार्वजनिक ठिकाणी अश्लील चाळे करणाऱ्यांना पाहून इरिना यांना राग अनावर झाला आणि त्यामधूनच त्यांनी या दोघांची धुलाई केल्याचे स्थानिक सांगतात.

या व्हायरल व्हिडिओवरुन आता या महिलेने केलेल्या कृतीचे समर्थन करणारे आणि विरोध करणारे असा वाद कमेंट सेक्शनमध्ये सुरु असल्याचे दिसत आहे. अनेकांनी सध्याची परिस्थिती पाहता या महिलेने केलेलं काम योग्यच असल्याचं म्हटलं आहे. तर काहीजणांनी मात्र हा त्या जोडप्याच्या स्वातंत्र्यावर केलेला हल्ला असून अशा गोष्टींना प्रोत्साहन देता कामा नये असं म्हटलं आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Angry woman spanks couple with plank after catching them having sex in a bush scsg