Viral Photo: सोशल मीडियामुळे कधी कुठला फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होईल हे सांगता येत नाही. रोज नवनवीन गोष्टी व्हायरल होताना आपण पाहतो, ज्यावरून अनेकदा मिम्स तयार होतात, चर्चा रंगतात तसेच वादही होतात. दरम्यान, नुकताच एक गमतीशीर फोटो खूप व्हायरल होत आहे, जो पाहून अनेक जण खळखळून हसताना दिसत आहेत.
सोशल मीडियावर व्हायरल होतोय फोटो
इन्स्टाग्रामवर हा फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून या फोटोमध्ये लग्नाची गाडी दिसत आहे. लग्नाच्या गाडीमागे नेहमीच वर-वधूच्या नावाचे पोस्टर लावलेले आपण पाहतो. या गाडीमागेदेखील लग्नाचे पोस्टर लावण्यात आले आहे. या पोस्टरमध्ये वर आणि वधूचे नाव “अनिल आणि समस्या” असं लिहिल्याचं दिसत आहे. यामुळे अनेक जण या फोटोवर गमतीशीर कमेंट्स करत आहेत.
हेही वाचा : वाघाची हुशारी पाहून तुम्हीही व्हाल चकित, हरणाच्या पिल्लाला झटक्यात काढलं शोधून; पाहा VIDEO
पाहा फोटो :
पण मजेशीर गोष्ट अशी आहे की, तुम्ही हा व्हारल फोटो नीट निरखून पाहिलात तर तुम्हाला दिसेल की, लग्नाच्या पोस्टरमधील नाव “अनिल आणि समस्या” नसून “अनिल आणि समरया” असं आहे. पण, अनेक जण हे नाव “समस्या” आहे असं समजून या पोस्टवर अनेक मजेशीर कमेंट्स करताना दिसत आहेत.
ही पोस्ट इन्स्टाग्रामवरील @expired.__ या अकाउंटवरून शेअर करण्यात आली आहे. ही पोस्ट वाचून एका युजरने कमेंटमध्ये लिहिलंय की, “नावातच समस्या आहे, म्हणजे त्याच्या आयुष्यात किती समस्या येतील.” तर दुसऱ्याने लिहिलंय की, “अनिलची समस्या अनिललाच माहीत”, तर तिसऱ्या एकाने लिहिलंय की, “अनिल तुझ्या घरी समस्या येणार आहे.” तर आणखी एकाने कमेंट करून सांगितलं की, “भावांनो तिचं नाव समस्या नाही ‘समरया’ आहे.”