Viral video: जंगलाचा राजा सिंह, ज्याला जंगलातील प्रत्येक प्राणी घाबरतो हे लहानपणासून आपण एकत आलो आहोत. सिंहाच्या तावडीत एखादा एकदा का सापडला की मग पु्न्हा सुटका नाही. त्यामुळे सिंहाच्या नादाला कुणी लागत नाही. पण अशी हिंमत एका हरणानं केलीय. कधी कधी आपल्यालाच आपली क्षमता माहिती नसते. त्यासाठी ठरावीक अनुभव आणि एखाद्या प्रसंगातून जावे लागते तेव्हा आपल्याला आपल्यातील खरी ताकद कळते. अशाच एका हरणानं जंगलातल्या चक्क दोन विशाल प्राण्यांना आस्मान दाखवलंय. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही म्हणाल…जिथं भीती संपते तिथं आयुष्य सुरु होतं…
या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक सिंह आणि हरीण समोरासमोर आहेत. हरिण पाण्यात जाताच त्याच्यावर मगर हल्ला करते मात्र तिच्या तावडीतून सुटत तो पाण्यााहेर येतो. यावेळी हरणानं मगरीला चांगलच अस्मान दाखवलंय. हरीण मगरीच्या तावडीतून अतिशय हुशारीनं सुटलं आहे. हरणाला पाण्याबाहेर येताना पाहून सिंह पुढे जातो मात्र क्षणात तो घाबरुन मागे वळतो. छोटा पॅकेट बडा धमाका असंच काहीसं या हरणानं केलं. जसा सिंह या हरणाच्या दिशेने यायचा तसंच हा हरीणही सिंहाच्या दिशेने जायचा. हे पाहून सिंहही घाबरला. या व्हिडीओमध्ये हरणाची हिंमत पाहून सिंहाचीच हवा टाईट झाल्याचं दिसत आहे. तुम्हीही हा व्हिडीओ नक्की पाहा.
एका छोट्याश्या हरणानं सिंहाला माघार घ्यायला लावली हे पाहून सगळेच अवाक् झाले. सर्वजण हरणाच्या हिंमतीला दाद देत आहेत.
पाहा व्हिडीओ
हेही वाचा >> वर्षाला जास्तीत जास्त पगार कसा वाढवायचा? तरुणानं सांगितल्या जबरदस्त ट्रिक्स; VIDEO एकदा पाहाच
सोशल मीडियात सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे, ज्यावर लोक वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहे. हा व्हिडीओ @AMAZlNGNATURE या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओला हजारोंमध्ये लाईक शेअर मिळत आहे. लोक वेगवेगळ्या प्रतिक्रियाही यावर नेटकरी देत आहेत. यावर काही युजर्सनी प्रतिक्रियाही दिल्या. एका युजरने म्हंटलंय की, “हरणाच्या जिद्दीला सलाम”, तर दुसरा युजर म्हणतो, “भीतीची भीती कशाला.”