भारतातील प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांच्या निधनामुळे संपूर्ण देशात शोककळा पसरली आहे. रतन टाटा यांच्या माणुसकीचं दर्शन अनेकांनी अनुभवले आहे. रतन टाटांच्या प्रत्येक कृतीतून आपण समाजासाठी काहीतरी देणं लागतो याची जाणीव करुन द्यायचे. रतन टाटा हे श्वानप्रेमी म्हणूनही ओळखले जात होते. रतन टाटांकडे विविध जातींचे श्वान होते. रस्त्यावरच्या भटक्या कुत्र्यांविषयी त्यांना वाटणारी आत्मियता याआधीही व्यक्त झाली आहे. टाटा यांनी या मुक्या प्राण्यांसाठी मुंबईमध्ये स्मॉल ॲनिमल हॉस्पिटल, (SAHM) उभारले आणि वयाच्या ८६व्या वर्षी आपलं स्वप्न पूर्ण केले महालक्ष्मी येथे ९८,००० रुपये चौरस फुटांवर असलेल्या विशेष पाळीव प्राणी रुग्णालय १ जुलै रोजी सुरु झाले.

पाळीव प्राण्यांचे हॉस्पिटल हा रतन टाटा यांचा शेवटचा प्रकल्प

रतन टाटा यांनी ₹१६५कोटीं खर्च करून देशातील पहिले अत्याधुनिक पाळीव प्राण्यांचे रुग्णालय उभारले जे २४ तास आपत्कालीन सेवा देऊ शकते. या कामासाठी त्यांचे सर्वांनी कौतुक केले. गंभीर आजारी आणि जखमी प्राण्यांसाठी आयसीयू आणि एचडीयू सेवा येथे उपलब्ध आहे. सीटी स्कॅन, एमआरआय, एक्स-रे आणि अल्ट्रासाऊंडसह प्रगत डायग्नोस्टिक इमेजिंग सेवा, शस्त्रक्रिया युनिट्स. विशेष उपचार (त्वचाविज्ञान, दंत, नेत्ररोग इ.). घरातील पॅथॉलॉजी लॅब, श्वान आणि मांजरींसाठी स्वतंत्र प्रतीक्षा क्षेत्र आणि आंतररुग्ण वार्ड अशा अनेक सुविधा येथे उपलब्ध आहेत.

Medical capital of india Which state of india is called medical capital Tamilnadu chennai
भारतातील ‘या’ राज्याची आहे ‘वैद्यकीय राजधानी’ म्हणून ओळख
Mulund renamed new Dharavi Dharavi redevelopment rehabilitation Mulund residents agitated boards
‘मुलुंडचे लवकरच नवीन धारावी नामांतर’, संतप्त मुलुंडवासियांकडून मुलुंडमध्ये…
leopard cub , leopard , Katol taluka,
VIDEO : दुरावलेल्या आई-पिल्लाची २४ तासानंतर भेट
vasai virar, dead animals
वसई विरार मध्ये मृत प्राण्यांच्या विल्हेवाटीसाठी दफनभूमी, जिल्हाधिकाऱ्यांकडून प्रस्तावास मंजुरी
Bhandara, woman deadbody , tiger attack, tiger ,
भंडारा : वाघाच्या हल्ल्यात ठार महिलेवर अंत्यसंस्कार करण्यास संतप्त ग्रामस्थांचा नकार, पोलीस ठाण्यात…
Which animals are banned in India
भारतात ‘हे’ २० प्राणी पाळण्यावर बंदी; घरात आढळल्यास होऊ शकते कारवाई
Bahelia hunter, tiger, tiger hunt Maharashtra,
महाराष्ट्रातील वाघ बहेलियांच्या रडारवर! राज्याला “रेड अलर्ट” !
benefits of cow urine
गोमूत्राने आजार बरे होतात? वैद्यकीय तज्ज्ञ काय सांगतात?

हेही वाचा – Ratan Tata’s Successors : कोण आहेत नोएल टाटा? रतन टाटांच्या निधनानंतर उत्तराधिकारी म्हणून यांच्या नावाची होतेय चर्चा

रतन टाटा यांनी पाहिले पाळीव प्राण्यांचे हॉस्पिटल उभारण्याचे स्वप्न

टाटां यांच्या श्वानाचे joint replacement करिता त्यांना मिनेसोटा विद्यापीठात घेऊन जावे लागले. पण तोपर्यंत खूप उशीरा झाला होता म्हणून त्याच्या श्वानाचे joint replacementऐवजी सांधे एका विशिष्ट स्थितीत गोठवावे लागले. या प्रसंगाने त्यांच्या मनात कायम राहिला ज्यामुळे आपल्या देशात उपलब्ध पाळीव प्राण्यांसाठी उच्च दर्जाची आरोग्यसेवा मिळावी अशी इच्छा निर्माण झाली.

हेही वाचा – Ratan Tata VIDEO : “पत्नी किंवा कुटुंब नसल्यामुळे अनेकवेळा मला एकटेपणा जाणवतो” रतन टाटा यांच्या जुन्या मुलाखतीचा व्हिडीओ व्हायरल

रतन टाटा यांनी पूर्ण केले आपले स्वप्न

प्राण्यांचे रुग्णालय उभारण्याचे काम बराच काळापासून सुरू होते. टाटा ट्रस्टने प्रथम २०१७ मध्ये याची घोषणा केली आणि त्यानंतर ते नवी मुंबईतील कळंबोली येथे हॉस्पिटल उभारणार होते पण नंतर त्यामध्ये बदल झाला आणि महालक्ष्मी येथील BMC कडून ३० वर्षांच्या हा भूखंड भाडेतत्त्वावर घेण्यात आला कारण हे स्थान शहराच्या मध्यभागी होते जे पत्कालीन परिस्थितीत- कोणालाही सहज पोहचता येईल अशा अंतरावर होते. कोरोनामुळे हॉस्पिटल सुरु होण्यास विलंब झाला.

“ना नफा नसलेले स्मॉल अॅनिमल पशुवैद्यकीय रुग्णालय हजारो प्राण्यांना २४ तास सेवा पुरवणार आहे. श्वांनाच्या पालकांना आणि त्यांच्या पाळीव प्राण्यांना सर्वात जास्त गरज असलेल्या सेवा पुरवणार आहे. यामध्ये प्राण्यांची काळजी आणि आरोग्य क्षेत्रातील सर्वात प्रभावी प्रकल्पांपैकी एक असण्याची क्षमता आहे.”

हेही वाचा -“दु:ख ही प्रेमाची किंमत, अलविदा…”; टाटांच्या निधनानंतर त्यांच्या ३० वर्षीय मित्राची भावनिक POST

शंतनू नायडू आणि रतन टाटा

या प्रकल्पातून टाटांचे प्राण्यांबद्दलचे प्रेम दिसून येते. AVCF च्या संचालक मंडळावर शंतनू नायडू आहेत, ज्यांनी मोटोपॉव या स्टार्टअपची स्थापना केली, जे कुत्र्यांसाठी परावर्तित कॉलर (reflective collars) बनवतात जेणेकरून ते रात्री वाहनांना प्राणी दिसू शकतात. टाटा यांनी नायडू यांना प्राणी कल्याणासाठी अधिक काम करण्याची मोकळीक दिली.

Story img Loader