तापमानाचा पारा सातत्याने चढा असताना सामान्य रुग्णालयांमध्ये रुग्णांची गर्दी वाढत आहे. पशुरुग्णांच्या संख्येही वाढ होत असल्याचे दिसते. उष्माघाताचा फटका बसणाऱ्या प्राणी तसेच पक्ष्यांना प्राणीमित्रांकडून डॉक्टरांकडे आणले जात असून अनेक प्राण्यांमध्ये श्वसनाचा त्रासही उद्भवत आहे.उन्हापासून संरक्षण करण्यासाठी माणसाला अनेक साधने वापरता येत असली तरी पशुपक्ष्यांना मात्र कोणताच आधार नसतो.वृक्षतोडीमुळे पक्षांची सावलीची हक्काची जागा शहरातून कमी होत असल्याने उन्हात फिरणाऱ्या प्राण्यांना उष्णतेचा सर्वाधिक त्रास होत आहे. त्याचप्रमाणे शरिरातील पाण कमी झाल्यानेही अनेकांच्या प्रकृती ढासळताना दिसतात. असाच एक व्हिडीओ सध्या व्हायरल होतोय, वाळवंटाचा राजा म्हणून ओळखला जाणारा उंट पाण्याशिवाय दीर्घकाळ जगण्यासाठी प्रसिद्ध आहे. मात्र उष्णतेच्या तीव्र लाटेचा फटका या जीवांनाही बसतो. एका व्हिडिओमध्ये एक उंट पाण्याअभावी अस्वस्थ झालेला दिसत होता.
या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, पाण्याअभावी एक उंट अर्धमेला झालेला दिसत होता. सुमारे ५५ अंश सेल्सिअस तापमान असलेल्या तीव्र उष्णतेने प्राण्याची हाल झाली आहे आणि त्याची प्रकृती बिघडत चालली होती. दरम्यान रस्त्यावरुन ट्रक चालकाला पुढे काहीतरी दिसतं, ज्यामुळे तो आपल वाहन थांबवतो आणि नंतर त्याला रस्त्याच्या कडेला एक उंट तहानलेल्या अवस्थेत जमिनीवर बसलेला दिसतो. तो खूप थकलेला आणि सुस्त दिसत होता. उंट रस्त्यावर बेशुद्ध पडलेला होता. त्या माणसाने काहीही विचार न करता त्याला पाण्याची बाटली दिली.
पाहा व्हिडीओ
हेही वाचा – Video: परिस्थिती सगळं काही शिकवते! चिमुकल्याची इच्छाशक्ती पाहून नेटकरी म्हणतात; लेक असावा तर असा…
ट्विटरवर शेअर करण्यात आलेला हा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. सोशल मीडिया वापरकर्त्यांना देखील या व्यक्तीचा प्राण्यांबद्दलचा दयाळूपणा पाहून खूप आनंद झाला. सगळ्यांनी त्याचं खूप कौतुक केलं. गरजेच्या वेळी अचानक येऊन मदत करणारे देवदूतांपेक्षा कमी नसतात, असं अनेकजण म्हणत आहेत.