Dogs Fight with Leopard: बिबट्याचा एक वार आणि समोरच्या प्राण्याचा खेळ खल्लास, असं म्हटलं जाते. बिबट्या हा अत्यंत चतुर आणि चलाख शिकाऱ्यांपैकी एक म्हणून ओळखला जातो. तो गर्द झाडी किंवा गडद अंधारातही अत्यंत सराईतपणे शिकार करू शकतो. बिबट्या पूर्ण ताकदीने शिकार करतो. आतापर्यंत बिबट्याचे तुम्ही असंख्य व्हिडीओ पाहिले असतील. बिबट्या लपून छपून योग्यवेळी इतर प्राण्यांवरती हल्ला करतो.
जंगलातील सर्वात थरार आणि रंजक व्हिडीओ असतात ते म्हणजे प्राण्यांचा शिकार करतानाचे…सिंह, वाघ आणि बिबट्याचे अनेक व्हिडीओ आपण पाहिले आहे. पण जेव्हा शिकारीच शिकार बनतो, तेव्हाचा भयानक आणि दुर्मिळ दृश्य आता कॅमेऱ्यात कैद झाला आहे. हा व्हिडीओ पाहताना हृदयाचे ठोके चुकतात. हे दृश्य क्वचितच कोणी पाहिलं असेल. धक्कादायक आणि अंगावर शहारा आणणारा हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही घाम फुटेल. सध्या सोशल मीडियावर या व्हिडीओने नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं आहे. नेमकं काय घडलं ते जाणून घेऊया…
जंगलात टिकून राहण्याचा एकच नियम आहे… इथे जो बलवान आणि ताकदवान आहे तोच टिकू शकतो! एकीकडे इथले शिकारी आपला जीव वाचवण्यासाठी इकडे तिकडे लपून बसतात, तर दुसरीकडे जंगलातील मांसाहारी प्राणी त्यांच्या शिकारीसाठी त्यांच्या मागे लागलेले असतात आणि जंगली शिकारीला शिकार दिसली की तो अत्यंत क्रूरपणे त्याची शिकार करतो. तथापि, कधीकधी गेम उलटतो. असाच एक व्हिडीओ सध्या लोकांमध्ये चर्चेत आहे.
जंगलातील भयानक शिकारी प्राण्यांबद्दल बोलायचे झाले तर बिबट्याही काही कमी नाहीत. या हृदयहीन प्राण्याला सायलेंट किलर असेही म्हणतात. तो झटक्यात आपल्या शिकारावर झेपावतो आणि त्याला मारतो. मात्र, शिकार करताना अनेकवेळा तो स्वतःच इतर प्राण्यांची शिकार होतो. असाच एक व्हिडीओ सध्या लोकांमध्ये चर्चेत आला आहे. जिथे कुत्र्यांच्या गटाने मिळून बिबट्याचा गेम केला आहे.
(हे ही वाचा : गेंड्याला पाहताच दोन सिंहांना फुटला घाम; जवळ येताच केलं असं की, जंगलातील व्हिडीओ पाहून तुम्हीही म्हणाल, शेवटी राजा कोण? )
व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता की, पाच ते सहा कुत्रे एका बिबट्यावर हल्ला करताना दिसत आहेत. बिबट्या मोठ मोठ्याने ओरडत आहे, परंतु हे कुत्रे इतके पिसाळलेले दिसताहेत की बिबट्याला मारल्याशिवाय ते शांत बसणार नाही असे वाटतेय. कुत्र्यांचा गट बिबट्याला जबड्यात धरून खेचताना आणि फाडताना दिसत आहे. यावेळी बिबट्या स्वत:ला वाचवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करताना दिसतोय. परंतु तो त्यांच्या तावडीतून सुटू शकला नाही.
येथे पाहा व्हिडीओ
हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर करण्यात आला आहे. एका युजरने लिहिले की, “असे दृश्य पाहणे दुर्मिळ आहे जिथे शिकारीच शिकार बनतो.” तर दुसऱ्याने लिहिले, “हे कुत्रे मनुष्यभक्षक झाले आहेत.”, अशाप्रकारच्या प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी दिल्या आहेत.