Shocking video: सोशल मीडियावर नेहमीच वेगवेगळे व्हिडीओ व्हायरल होत असतात. हे व्हिडीओ कधी मनोरंजक असतात, तर कधी हृदयाचे ठोके चुकवणारे असतात. सध्या असाच एक व्हिडीओ समोर आला आहे, जो पाहून तुम्हाला धक्का बसेल. प्राण्यांचे अनेक व्हिडीओ रोज सोशल मीडियावर व्हायरल होत असतात, त्यातील काही व्हिडीओंमध्ये रानटी प्राण्यांचे रौद्र रूपदेखील आपल्याला पाहायला मिळते
मगरींबद्दल बोलायचे झाले तर मगरी भयानक असतात. मगरींमध्ये सिंहाचीही शिकार करण्याची शक्ती आहे. सोशल मीडियावर असे अनेक व्हिडीओही तुम्ही पाहिले असतील, ज्यात मगरी मोठ मोठ्या प्राण्यांची शिकार करताना दिसतात.तर दुसरीकडे साप म्हटलं तरी अंगावर काटा येतो. साप असा एक खतरनाक प्राणी आहे कि त्याच्या एका चाव्याने माणसाचा जागीच मृत्यू होऊ शकतो.जगात अनेक विषारी साप आहेत.ज्यांच्यापासून लांब राहणं केव्हाही चांगलं. त्यात अजगर हा जगातील असा प्राणी आहे, जो स्वतःपेक्षा मोठ्या प्राण्यांनाही गिळू शकतो. जर कुणी अजगराच्या तावडीत सापडलं तर त्याची सूटका होणे सगळ्यात अवघड असतं. अशाच एका मगरीचा आणि महाकाय अजगराचा आमना सामना झाला आहे. या दोन खतरनाक प्राण्यांच्या लढाईत शेवटी कोण जिंकलं ते तुम्हीच पाहा.संपूर्ण व्हिडीओ पाहताना अंगावर काटे आल्याशिवाय राहणार नाही हे मात्र नक्की.
या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, अजगरानं मगरीवर हल्ला करत थेट तिच्या जबड्यावर निशाणा साधला. यावेळी चलाक मगरीनेही अजगराला विरोध करत त्याच्यावर उलटा हल्ला चढवला. मगरीच्या दातांची पकड एवढी मजबूत असते की मगरीच्या एका हल्ल्यातच अजगर जखमी झाला. मगरीवर हल्ला करणं अजगराला चांगलंच महागात पडलं. शेवटी अजगराला मगरीसमोर हार पत्करावी लागली. ही थरारक लढाई पाहून तुमचाही थरकाप उडेल.
पाहा व्हिडीओ
सोशल मीडियात सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे, ज्यावर लोक वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहे. हा व्हिडीओ @AMAZlNGNATURE या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओला हजारोंमध्ये लाईक शेअर मिळत आहे. लोक वेगवेगळ्या प्रतिक्रियाही यावर नेटकरी देत आहेत. यावर काही युजर्सनी प्रतिक्रियाही दिल्या. एका युजरने म्हंटलंय की, “मगरीच्या जिद्दीला सलाम”, तर दुसरा युजर म्हणतो, “म्हणून जास्त हवेत जायचं नाही.”