Viral Video: जगात अनेकांना आपल्याकडे असलेल्या गोष्टींचा गर्व असतो. काहींना त्यांच्या हुशारीचा तर काहींना त्यांच्या सौंदर्याचा, पैशांचा, शक्तीचा गर्व असतो. आपल्याकडे असलेल्या गोष्टींचा गर्व करून समोरच्याला कमकुवत समजणारे आपल्या अति शहाणापणामुळे अनेकदा तोंडघशी पडतात. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. पण, या व्हिडीओमध्ये कोणी व्यक्ती नसून एक प्राणी पाहायला मिळतोय, जो त्याच्या शक्तीचा दुरुपयोग करायला जातो आणि त्याच्याबरोबर असं काहीतरी घडतं, जे पाहून नेटकरीही आश्चर्यचकित झाले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

समाजमाध्यमांवर आपण विविध प्रकारचे व्हिडीओ व्हायरल झालेले पाहतो, ज्यातील काही व्हिडीओंमुळे आपले मनोरंजन होते तर काही व्हिडीओ आपल्या काळजाचा ठोका चुकवतात. आता व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये असंच काहीतरी पाहायला मिळत आहे.

या व्हायरल व्हिडीओमध्ये एक गेंडा रस्त्याच्या बाजूला असलेल्या झाडीतून बाहेर येतो आणि सरळ समोरून येणाऱ्या ट्रॅकवर हल्ला करण्याचा प्रयत्न करतो. पण, यावेळी त्या ट्रकला किंवा ट्रकचालकाला कोणतीच इजा होत नाही. उलट गेंडाच ट्रकला धडक दिल्यामुळे रस्त्यावर पडतो. त्यानंतर तो उठून पुन्हा रस्त्याच्या बाजूच्या झाडीत जाण्यासाठी वळतो, पण त्याला दुखापत झाल्यामुळे पुढे जाऊन तो पुन्हा रस्त्यावर पडतो. सध्या हा व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे.

हेही वाचा: “जगण्यासाठी रोज नवा संघर्ष…” भुकेने व्याकूळ झालेल्या चित्त्याने हरणावर हल्ला करण्यासाठी लढवली युक्ती; चित्तथरारक Video एकदा पाहाच

पाहा व्हिडीओ:

हा व्हायरल व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील एका अकाउंटवर शेअर करण्यात आला असून यावर आतापर्यंत जवळपास नऊ लाखांहून अधिक व्ह्यूज आणि हजारो लाइक्स मिळाल्या आहेत.

तसेच अनेक युजर्स यावर कमेंट्स करताना दिसत आहेत. त्यातील एका युजरने कमेंटमध्ये लिहिलंय की, “शक्तीचा असा कुठेही वापर करू नये”, तर दुसऱ्या युजरने लिहिलंय की, “याची चांगलीच जिरली”, तर तिसऱ्याने लिहिलंय की, “मस्ती, दुसरं काय”, तर आणखी अनेक युजर्स हा व्हिडीओ पाहून हसताना दिसत आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Animal viral video rhino tries to attack truck driver but he fell on the road users say this is karma sap