राजस्थानच्या भिवाडामधून पाकिस्तानमध्ये पोहचलेल्या अंजूची चर्चा दिवसभर होते आहे. तिचा पती अरविंद याने अंजू मला मी जयपूरला फिरायला जाते असं सांगून गेली पण नंतर ती पाकिस्तानाला गेल्याचं समजलं असं म्हटलं आहे. तर दुसरीकडे अंजूचा भाऊ डेव्हिड यांनी अंजू गोव्याला जाणार होती पण तिचं बजेट बसत नव्हतं त्यामुळे तिने गोव्याला जाणं रद्द केलं अशी माहिती दिली आहे.

अंजूचा भाऊ डेव्हिड याने नेमकं काय सांगितलं?

“अंजू गोव्याला जाण्यासाठी तयारी करत होती. पण तिने तो प्लान रद्द केला आणि आम्हाला सांगितलं की मी जयपूरला जाते आहे. जयपूरला जाऊन मी फिरुन येणार आहे असं तिने सांगितलं. जयपूरला तिची एक मैत्रीणही राहते. २१ जुलैला ती जयपूरच्या ऐवजी पंजाबमधल्या अमृतसर या ठिकाणी गेली. तिथून तिने फोनही केला होता. पण तेव्हा मी पाकिस्तानला चालले हे तिने सांगितलं नव्हतं. अंजू पाकिस्तानला गेली हे आम्हाला आत्ताच समजलं आहे.” आज तकने या विषयीचं वृत्त दिलं आहे.

Mumbai police absconded
मुंबई: १९ वर्षांपासून फरार आरोपी आरोपीला अखेर पकडले
16 November Aries To Pisces Horoscope Today in Marathi
१६ नोव्हेंबर पंचांग: कृतिका नक्षत्रात मेषला शुभ दिवस,…
Amit Shah IMP Statement about CM Post
Amit Shah : ‘महायुतीचं सरकार आल्यास मुख्यमंत्री कोण?’ अमित शाह म्हणाले, “नेतृत्व…”
saif ali khan threat inter religion marriage
आंतरधर्मीय विवाहामुळे सैफ अली खानला मिळाल्या होत्या धमक्या; स्वतः खुलासा करत म्हणालेला, “आमच्या घराजवळ…”
Tula Shikvin Changlach Dhada
भुवनेश्वरी आणि चारुलताच्या गोंधळात अक्षराच वेडी ठरणार; नेटकरी म्हणाले, “शिक्षिका असून सुद्धा…”
Tharala Tar Mag New Promo
ठरलं तर मग : बाप-लेकीची भेट! अर्जुनने निभावलं जावयाचं कर्तव्य, मधुभाऊंना पाहताच सायलीला अश्रू अनावर, पाहा प्रोमो
deputy cm devendra fadnavis open up about late Rajendra Patni son dnyayak patni in karanja
फडणवीस म्हणाले, “पाटणी पुत्राची समजूत घालण्याचा प्रयत्न केला, पण…”
Uddhav Thackeray On Jay Shah :
Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंचं जय शाह यांना खुलं आव्हान; म्हणाले, “गावातील कोणत्याही तरुणाबरोबर क्रिकेट खेळून दाखवावं, मग…”

हे पण वाचा- “सीमाशी तुलना करू नका, मी परत येईन”, प्रियकरासाठी थेट पाकिस्तान गाठलेल्या अंजूची पहिली प्रतिक्रिया!

अंजूचा भाऊ म्हणतो आम्ही लहानपणापासून ख्रिश्चन

अंजूच्या भावाने ही माहिती दिली आहे की आम्ही सगळे लहान असल्यापासूनच ख्रिश्चन आहोत. आमचे आजोबा हिंदू होते. मात्र वडिलांनी ख्रिश्चन धर्म स्वीकारला. त्यानंतर आम्ही ख्रिश्चनच झालो. डेव्हिडने हे पण सांगितलं की आम्ही मूळचे ग्वाल्हेरचे आहोत. अंजू दोन दिवसात भारतात परतेल, असा दावाही डेव्हिडने केला आहे.

काय आहे हे प्रकरण?

अंजू नावाची एक भारतीय महिला पाकिस्तानात पोहचली आहे. आपण आपल्या प्रियकरासाठी पाकिस्तानात आल्याचं तिने म्हटलं आहे. प्रियकरासाठी पाकिस्तानातून भारतात आलेल्या सीमा हैदरचं प्रकरण ताजं असतानाच ही नवी घटना समोर आली आहे. राजस्थानच्या भिवडीमधली विवाहिता अंजू ही थेत पाकिस्तानच्या खैबर पख्तुनख्वा प्रांतात प्रियकराला भेटण्यासाठी गेली आहे. तिच्या पतीला आणि मुलांना सोडून तिने पाकिस्तान गाठलं. ज्यानंतर तिच्या पतीने काही धक्कादायक खुलासे केले आहेत.

हे पण वाचा- “जयपूरला जाते असं सांगितलं आणि…”, पाकिस्तानात गेलेल्या भारतीय महिलेच्या पतीचा धक्कादायक खुलासा

काय म्हटलं आहे अंजूच्या पतीने?

चार दिवसांपूर्वी अंजू मला म्हणाली की मी फिरायला जाते आहे. मी तिला विचारलं कुठे जाते आहेस? तर ती म्हणाली जयपूरला. काही दिवसात परत येईन असंही तिने सांगितलं होतं. मात्र आता ती पाकिस्तानात गेल्याचं कळतं आहे. तिने माझ्याशी What’s App कॉलवरुन संपर्क केला होता. तेव्हा तिने मला सांगितलं की मी पाकिस्तानातल्या लाहोरमध्ये आहे. दोन ते तीन दिवसांमध्ये मी परत येईन. असं सांगितलं मात्र आता ती पाकिस्तानात असल्याचं मला तुमच्याकडून कळतं आहे असं अंजूच्या पतीने ANI ला ही प्रतिक्रिया दिली आहे.

पोलिसांनी या सगळ्या प्रकरणी काय म्हटलं आहे?

अंजू नावाची महिला पाकिस्तानला गेल्याचं आम्हाला मीडियात आलेल्या बातम्यांद्वारेच आम्हाला कळलं. पाकिस्तानात ती तिच्या प्रियकराकडे गेली आहे. तो मुलगा फेसबुक, व्हॉट्स अॅप कॉलिंग या माध्यमातून तिच्या संपर्कात आला होता. गुरुवारी मी फिरायला जाते आहे असं तिने तिचा पती अरविंदला सांगितलं. अरविंद आणि अंजू हे दोघंही २००७ पासून भिवाडी या ठिकाणी राहतात. मात्र २१ जुलैला ती पाकिस्तानात गेली आहे ही माहिती आमच्याकडे आहे. २०२० मध्ये अंजूने पासपोर्टसाठी अर्ज केला होता. ती पाकिस्तानात कशी गेली ते आम्हाला समजू शकलेलं नाही. असं ASP सुजीत शंकर यांनी ANI ला सांगितलं आहे. अद्याप याबाबत आम्हाला कुठलीही तक्रार मिळालेली नाही. आम्ही आमच्या पद्धतीने तपास करत आहोत असंही शंकर यांनी सांगितलं.