Viral Video: अनेकांचे आयएएस अधिकारी होण्याचे स्वप्न असते. मात्र, यूपीएससीची नागरी सेवा परीक्षा उत्तीर्ण होणे खूप कठीण बाब आहे. लोक वर्षानुवर्षे या परीक्षेची तयारी करतात. मात्र, तरीही उत्तीर्ण होत नाहीत. पण, काही जण याला अपवाद असतात. एका तरुणीला यूपीएससी परीक्षेत देशात ९९ वा रँक (AIR- 99 ) मिळवला आहे. अशा मेहनती विद्यार्थ्यांच्या सुखदुःखात आपलं कुटुंब आपल्यामागे एक सावली म्हणून चालत असते. त्यामुळे जेव्हा आपण अशा कठीण परीक्षांना पास करून आपण त्यांचे नाव उज्जवल करतो तेव्हा त्यांचाही आनंद गगनात मावत नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

व्हायरल व्हिडीओची सुरुवात अन्नपूर्णा सिंहचा पीडीएफमध्ये रिझल्ट सर्च करताना होते. त्यानंतर तरुणीच्या घरचे ढोल ताशांसह  तिचे स्वागत करतात. वडिलांच्या पाय पडून ती त्यांचे आशिर्वाद घेते आणि त्यानंतर खरा प्रवास सुरु होतो. तरुणीच्या गावकरी रहिवाशांनी तर ज्या शाळेत तिने शिक्षण घेतले तिथेही तिचे अगदीच खास पद्धतीने तिचे स्वागत करण्यात आले. शाळेतील अनेक विद्यार्थ्यांनी परेड करत तिला मान-सन्मान दिला. त्यानंतर तिने शाळेतील विद्यार्थ्यांबरोबर संवाद साधला. अन्नपूर्णा सिंहचा पास होण्याचा आनंद कशाप्रकारे व्यक्त करण्यात आला आहे एकदा व्हायरल व्हिडीओतून तुम्हीसुद्धा बघा.

हेही वाचा…धक्कादायक! जंगल सफारी दरम्यान पर्यटकांच्या कारजवळ आला जिराफ अन्… VIDEO पाहून फुटेल घाम

व्हिडीओ नक्की बघा…

व्हायरल व्हिडीओत तुम्ही पाहिलं असेल की, अगदी कुटुंबातील सदस्यांपासून ते शाळेतील शिक्षकांपर्यंत सर्वानी अगदीच मनापासून तरुणीचे कौतुक केलं आहे. तिने या सगळ्या प्रेमाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे आणि भारत देशाची आणि त्यांच्या मुलांची मनापासून सेवा करेन असे देखील कॅप्शनमध्ये म्हणाले आहे. नेटकरी तरुणीचा हा प्रवास आणि तिच्यावर होणाऱ्या प्रेमाचा वर्षाव पाहून तिला कमेंटमध्ये शुभेच्छा देताना व तिचे कौतुक करताना दिसून आले आहेत.

अन्नपूर्णा सिंहने तिच्या @annapurnasingh99 इन्स्टाग्राम अकाउंटवर हा घरवापसीचा व्हिडीओ शेअर केला आहे. व्हिडीओ शेअर करताना तिने युपीएसी २०२३ च्या निकालानंतरच्या प्रत्येक सेलिब्रेशनला तिच्या हृदयात एक विशेष स्थान का दिले याचे वर्णन करताना लिहिले की, “मला अजूनही आश्चर्य वाटते की PDF मधील एक नाव एखाद्याचे आयुष्य कसे बदलू शकते. त्यानंतर ‘घरवापसी’ म्हणून हा असं सेलिब्रेशन करणे वैयक्तिकरित्या खूप खास आहे. तसेच ती पुढे म्हणाली की, “ज्या लोकांनी तुम्हाला कठीण प्रसंगात धरून ठेवले आहे; हे त्या जागेवर विजयी होऊन परत येण्याबद्दलची भावना आहे”. अशी कॅप्शन तिने पोस्टला दिली आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Annapurna singh who secured air shared a video homecoming post upsc results on instagram watch ones asp
Show comments