Bryan Johnson anti ageing diet: अमेरिकन उद्योगपती आणि बायोटेक फर्मचे सीईओ ब्रायन जॉन्सन हे अब्जाधीश आहेत. पण ते सध्या वेगळ्या कारणामुळे चर्चेत आहेत. गेल्या काही काळापासून ते चिरतरुण राहण्यासाठी खास गोष्ट करत आहेत.वयाच्या ४७ व्या वर्षीही ते एखाद्या १८ वर्षांच्या तरुणासारखे दिसत आहेत, असा त्यांचा दावा आहे. ‘एज रिव्हर्स डाएट’ अशा प्रकारच्या आहाराच्या आधारावर ते असा दावा करत आहेत. या डाएटसाठी ते दरवर्षी सुमारे २ दशलक्ष डॉलर्स (१६ कोटी रुपये) खर्च करतात अशीही माहिती आहे.
अलीकडे, जॉन्सनने त्याची चार दिवसांचं जेवण कशा पद्धतीचे आहे हे सोशल मीडियावर शेअर केलं आहे. मात्र हे जेवण भारतीयांमध्ये सध्या चर्चेचा विषय बनला आहे. ज्या जेवणावर कोटी खर्च केले जातात तेच जेवण भारतीय रोज खातात अशा पद्धतीची चर्चा सध्या रंगली आहे. आता तुम्हालाही प्रश्न पडला असेल की हा अब्जाधीश नक्की काय जेवतो? तर चला जाणून घेऊ.
त्याच्या ताटात काय आहे?
जॉन्सनने पुढील चार दिवसांसाठी त्याच्या प्री-पॅक केलेल्या जेवणाचा फोटो पोस्ट केला आहे.यावेळी तो म्हणतो पुढचे चार दिवस मी हे खाणार आहे. त्यामध्ये चण्याची भाजी, लिंबू मसूर सूप, वेजीटेबल स्टीर फ्राय वीथ फ्लॉवर राइस आहे.
पाहा जेवणाचा मेन्यू
कोण आहेत ब्रायन जॉन्सन?
अमेरिकेतील कॅलिफोर्नियास्थित केर्नलको बायोटेक कंपनीचे सीईओ ब्रायन जॉन्सन सध्या ४५ वर्षांचे असून जॉन्सन एक उद्योजक, उद्यम भांडवलदार, स्वयंघोषित ‘आरोग्य कायाकल्प ॲथलीट’ आणि व्लॉगर आहेत.
हेही वाचा >> दिवसेंदिवस कंगाल होत चाललेल्या पाकिस्तानात सेकंड हँड कारची किंमत माहितीये का? VIDEO पाहून धक्का बसेल
बऱ्याच जणांनी जॉन्सनच्या शिस्तीची प्रशंसा केली, परंतु काहींनी म्हंटलंय की, “ हे भारतीय जेवण आहे फक्त यामध्ये मसाले नाहीत,” इतरांनी विनोद केला की त्याच्या पुढच्या जेवणात छोले भटुरे किंवा गोभी आलू असू शकतात. त्याच्या जेवणात असलेल्या धातूच्या डब्यांनीही अनेक भारतीय टिफीन बॉक्सची आठवण करून दिली