India vs New Zealand ICC Cricket World Cup 2023 Match Updates : अटीतटीची ठरलेली विश्वचषक स्पर्धा २०२३ च्या उपांत्य फेरीतल्या पहिल्या सामन्यात भारताने न्युझीलंडवर मात केली. मुंबईच्या वानखेडे स्टेडिअमवर झालेल्या सामन्यात विराट कोहलीने मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडित काढला. या यशस्वी सामन्यामुळे भारताचे अंतिम सामन्यातील तिकिट पक्के झाले आहे. वर्ल्ड कप २०२३ मधील अनेक सामन्यांदरम्यान विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांची जोडीही हिट ठरली. मैदानातील त्यांच्या हालचाली टिपण्यात कॅमेरे सज्ज होते. तर, अनुष्काच्या सोशल मीडियावरील प्रतिक्रियांकडेही क्रिकेटप्रेमींचं लक्ष होतं. दरम्यान, काल (१५ नोव्हेंबर) झालेल्या सामन्यात अनुष्काच्या आऊटफिटनेही लक्ष वेधून घेतलं. तिचा ओव्हरसाईज शर्ट चर्चेचा विषय ठरला. हा ओव्हर साईज शर्ट नेमका कोणता होता? त्याची किंमत काय हे जाणून घेऊयात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

सामन्यादरम्यान अभिनेत्री अनुष्का शर्मा टीम इंडिया आणि तिचा पती विराट कोहली यांना चिअर करताना दिसली. तसंच, सामना संपल्यानंतर अनुष्काला शोधतानाचा विराटचा व्हिडीओही व्हायरल झाला. या जोडप्यातील हे प्रेमळ क्षण व्हायरल झाल्यानंतर अनुष्काच्या आऊटफिटचीही चर्चा रंगली होती. तिने मोठ्या आकाराचा शर्ट (OverSize Shirt) आणि मॅचिंग शॉर्ट्स परिधान केले होते. अत्यंत आरामदायी असलेल्या आऊटफिटमध्ये ती आकर्षक दिसत होती. आरामदायी असलेल्या को-ऑर्ड सेटमध्ये मोठ्या आकाराच्या चमकदार हिरव्या फुलांची प्रिंट (Floral Print Oversize Shirt) होती. अनुष्कानं परिधान केलेलं चंकी गोल्डन ब्रेसलेटही लोकांचं लक्ष वेधून घेत होतं.

हेही वाचा >> “देव सर्वोत्कृष्ट लेखक”! विराट कोहलीच्या ५० व्या शतकानंतर अनुष्का शर्माची पोस्ट; म्हणाली, “मला तुझं प्रेम…”

भारत विरुद्ध न्यूझीलंड उपांत्य फेरीच्या सामन्यात अनुष्का शर्माने परिधान केलेला को-ऑर्ड ध्रुव कपूर या लेबलचा आहे, असं वृत्त इंडिया टुडेने दिले आहे. तिने घातलेल्या फ्लोरल-प्रिंट ओव्हरसाईज शर्टची किंमत १९ हजार ५०० रुपये आहे. तर, मॅचिंग शॉर्ट्सह हा को-ऑर्ड घ्यायचा असेल तर त्याची किंमत २७ हजार ५०० आहे. या ब्रॅण्डच्या संकेतस्थळावर ही किंमत देण्यात आली आहे.

दरम्यान, सामना संपल्यानंतर अनुष्काने इन्स्टाग्रामवर पोस्ट लिहिली होती. त्यात ती म्हणते की, “देव हा सर्वोत्कृष्ट लेखक आहे! मी देवाची खूप आभारी आहे की मला तुझं प्रेम मिळालं, तुला दिवसेंदिवस मजबूत होताना आणि तुझ्या सर्व इच्छा पूर्ण होताना मला बघता आलं. तू स्वत:शी आणि खेळाशी नेहमी प्रामाणिक राहिलास. तू खरोखरच दैवी देणगी आहेस.