World Cup Final, India vs Australia: एकदिवसीय विश्वचषक २०२३ मधील अंतिम सामना भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर सुरू आहे. मात्र सध्या भारताचा स्कोर पाहता क्रिकेटप्रेमी चिंतेत पडले आहेत. दरम्यान टीम इंडियाला सपोर्ट करण्यासाठी बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा लेकीसह अहमदाबादला गेली आहे. अनुष्का शर्मा आणि अथिया शेट्टी यांचे फोटो व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. विराटला पाठिंबा देण्यासाठी अनुष्का शर्मा स्टँडमधून त्याला चिअर करताना दिसत आहे. तिच्या त्या आनंदाची, उत्साहाची जशी चर्चा होत आहे, तशीच चर्चा सामन्यादरम्यान तिने घातलेल्या निळ्या फुलाफुलांच्या ड्रेसची आणि त्याच्या किमतीचीही होत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अनुष्का शर्माचे स्टेडियममधले फोटो व्हायरल झाल्यानंतर तिच्या ड्रेसची चर्चा होऊ लागली. अनुष्काच्या ड्रेसमध्ये हॉल्टर नेकलाइनची वैशिष्ट्याची सुंदर प्रिंट आहे. तिच्या या फ्लोरल ड्रेसन अनेकांचं लक्ष वेधलं.

तर अनेकांना या ड्रेसची किंमत किती आहे हे जाणून घेण्याचीही उत्सुकता लागली आहे.  

पाहा किंमत

हेही वाचा >> “भावा आता हनुमान चालीसेशिवाय….” भारताच्या विकेट्सनंतर सोशल मीडियावर मीम्सचा महापूर

विश्वचषक फायनलसाठी अनुष्काने परिधान केलेला पोशाख निकोबारच्या स्वदेशी लेबलचा आहे तर याची किंमत ७,२५० रुपये इतकी आहे.

सेलिब्रिटींचे ड्रेस म्हटलं की डोळ्यासमोर लाखोंच्या किंमती फिरू लागतात. पण अनुष्का शर्माच्या या ड्रेसची किंमत ही जास्त नाही तर कमी असल्यामुळे जास्त चर्चेचा विषय बनलाय. बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा तिच्या चित्रपटांसोबतच हटके व आकर्षक स्टाइलसाठीही चर्चेत येत असते. फक्त भारतातच नव्हे तर जागतिक पातळीवर सुद्धा तिला स्टाइल स्टेटमेंटसाठी ओळखलं जातं. तुम्ही सेलिब्रिटींच्या फॅशन सेन्सला फॉलो करत असाल तर अनुष्काने परिधान केलेल्या या ड्रेसला तुम्ही देखील खरेदी शकता.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Anushka sharmas dress for india vs australia world cup final costs rs india vs australia world cup final 2023 srk