World’s Largest Feet: जगभरातील लोक विश्व विक्रम करण्यासाठी वेगवेगळे प्रयत्न करताना पाहायला मिळतात. कधीकधी काही विक्रम फार वेगळे असतात. असाच काहीसा अनोखा विक्रम अमेरिकेतील एका महिलेच्या आपल्या नावे नोंदविला गेला आहे. अमेरिकेतील या महिलेच्या नावे जगातील सर्वात मोठे पाय असल्याचा विश्व विक्रम आहे. अलिकडेच या महिलेचे नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवण्यात आलं आहे.

गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डनुसार, अमेरिकेच्या (America) टेक्सासमध्ये राहणाऱ्या येथील तान्या हर्बर्ट नावाच्या महिलेच्या नावावर हा नवा विक्रम नोंदवण्यात आला आहे. अमेरिकेच्या तान्या हर्बर्ट (Tanya Herbert). यांची त्यांच्या पायांमुळे त्यांची गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये (Guinness book of world record) नोंद झाली आहे.

Meet Sikkim’s first female IPS Officer, who lost her mother at a young age, cracked UPSC twice Success Story of Aparajita Rai
लहान वयातच आई गमावली, परिस्थितीचे चटके सहन केले पण हार मानली नाही; बनली सिक्कीमची पहिली महिला आयपीएस
china biggest dam in the world
चीनमधील ‘या’ अवाढव्य धरणामुळे पृथ्वीचा वेग मंदावला? धरणाचा…
MS Dhoni enjoying riding a bike in Ranchi after his holiday in America video gone viral
MS Dhoni : अमेरिकेतून परतल्यानंतर धोनीने बाईकवरुन फार्महाऊसमध्ये मारला फेरफटका, VIDEO व्हायरल
Pune leads the country in affordable housing
परवडणाऱ्या घरांमध्ये पुणे देशात आघाडीवर! मागणी सर्वाधिक कुठे अन् किमती जाणून घ्या…
chance for America to erase its history of inequality
अमेरिकेला विषमतेचा इतिहास पुसण्याची संधी…
most overworked countries
Most Overworked Countries in World : जगातील कोणत्या देशात सर्वाधिक तास काम करावं लागतं? भारतात किती तास काम केलं जातं?
Shapoorji Pallonji Group latest marathi news
टाटा सन्सच्या ‘आयपीओ’बाबत शापूरजी पालनजी समूह आग्रही
These countries have the most rivers in the world
जगातील ‘या’ देशांमध्ये आहेत सर्वाधिक नद्या; जाणून घ्या भारतातील नद्यांची संख्या

सर्वात मोठे पाय असल्याचा विश्व विक्रम
तान्या हर्बर्ट यांची त्यांच्या पायांमुळे गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे. त्यांच्याएवढे जगातील कुठल्याच महिलेचे पाय मोठे नसल्याचं दिसून आलं आहे. त्यांच्या पायाची लांबी आहे ३२.५ सेंटीमीटर म्हणजेच साधारणतः १२.७९ इंच. तान्या हर्बर्ट यांना १८ नंबरच्या चपला वापराव्या लागतात. त्यांची उंची आहे ६ फूट ९ इंच. जगातील सर्वात उंच महिलेपेक्षा त्यांची उंची केवळ ३ इंचांनी कमी आहे. टर्कीच्या रुमेयसा गेल्गी यांची उंची ७ फूट आणि ०.७ इंच आहे.

(आणखी वाचा : काय सांगता! देशी दारू प्यायले अन् चक्क २४ हत्ती गाढ झोपले; या अजब प्रकाराचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल)

पायाच्या साईजचे जोडे मिळणं कठीण

तान्या हर्बर्ट यांचे पाय फार मोठे असल्यामुळे त्यांना चप्पल मिळवण्यासाठी एकमागून एक दुकानं पालथी घालावी लागतात. त्यांना १८ नंबरची चप्पल लागत असल्यामुळे चप्पल खरेदी हे एक मोठं त्यांच्यासाठी आव्हानच असतं. हा अनुभव वारंवार आल्यामुळे त्यांनी दुकानात जाणंच बंद करून टाकलं आहे. त्या सांगतात, “हायस्कूलमध्ये असेपर्यंत मला दुकानातून चप्पल मिळत होते. मात्र, त्यानंतर माझ्या पायाचा आकार असा काही वाढत गेला की कुठल्याच दुकानात त्या आकाराचे जोडे मिळणं अवघड होत गेलं. मात्र ही बाब म्हणजे आपल्यात असणारी काहीतरी कमतरता आहे, असं मला माझ्या आईवडिलांनी कधीच जाणवू दिलं नाही. त्यामुळे मला कधीच निराशा आली नाही.” सुरुवातीला पुरुषांच्या चपला त्यांना बसायच्या, मात्र हळूहळू त्याही लहान होऊ लागल्या. आता तान्याला चपला शिवूनच घ्याव्या लागतात.

आईवडिलांचा आणि मित्रांचा पाठिंबा
हर्बर्ट सांगतात,”माझे पाय मोठे असण्याबाबत माझ्या आईवडिलांनी किंवा माझ्या मित्रांनी कधीही माझी खिल्ली उडवली नाही. त्यांनी नेहमी मला या गोष्टीवरून प्रोत्साहनच दिलं.