Appacha vishay lay hard hai Viral Video: सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल याचा काही नेम नाही. सोशल मीडियाच्या या जगात एखाद्या व्हायरल झालेल्या व्हिडीओमुळे लोक प्रसिद्धी कमावतात. एखादी गोष्ट व्हायरल झाली की त्याचा गवगवा काही दिवस असतो, मग दुसरी कोणतीतरी गोष्ट व्हायरल होते आणि असं रोजच्या रोज घडत असतं. यातलंच आत्ताचं ताजं उदारण म्हणजे ‘आप्पा.’

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

गेल्या काही दिवसांपासून “आप्पाचा विषय लई हार्ड आहे” हे गाणं सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतंय. सोशल मीडिया इन्फ्लूएनर्स या गाण्यावर रील शूट करत आपला व्हिडीओ शेअर करताना दिसतायत. या ट्रेंडिंग गाण्यावर अगदी चिमुकल्यांसह वयोवृद्ध माणसंही आपला स्वॅग दाखवायला मागे पुढे पाहत नाहीत. आता असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय, ज्यामध्ये हे आप्पा आहेत तरी कोणं हे कळलंय.

व्हायरल व्हिडीओ (Viral Video)

सोशल मीडियावर धुमाकूळ घालणाऱ्या या ट्रेंडिंग गाण्यावर आता आजोबांची एक रील तुफान व्हायरल होतेय. या व्हायरल झालेल्या व्हिडीओत एक आजोबा बाईक चालवताना दिसतायत. आता तुम्ही म्हणाल यात काय नवीन? पण, या बाईकवर आजोबा एका श्वानाला फिरवतायत. हा श्वान त्यांच्या मागच्या सीटवर निर्भीडपणे उभा आहे. पांढरा सदरा, टोपी घालून हे आजोबा श्वानाबरोबर डबल सीट आपला प्रवास करतायत.

हेही वाचा… Dahi Handi 2024: ‘गोविंदा आला रे आला’, मुंबईकरांनो ‘या’ सात ठिकाणांच्या भव्य दहीहंड्या चुकवू नका; लाइव्ह म्युझिक, डीजेसह गोविंदांना मिळतात लाखोंची बक्षिसे

व्हायरल झालेला हा व्हिडीओ marathi_epic_jokes या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. तर “हेच ते आप्पा” असं कॅप्शनदेखील या व्हिडीओला दिलं आहे.

हेही वाचा… डान्स करता करता मुलानं झटकला मुलीचा हात; ‘त्या’ समारंभात नेमकं घडलं तरी काय? VIRAL VIDEO एकदा पाहाच

युजर्सच्या प्रतिक्रिया

आप्पांचा हा व्हायरल व्हिडीओ पाहून अनेकांनी यावर कमेंट करत आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने कमेंट करत लिहिलं, आप्पा खूपच डेंजर आहेत. तर दुसऱ्याने “आप्पा म्हणजे नाद खुळा” अशी कमेंट केली आहे. तर एक जण म्हणाला, “वाह, शेवटी सापडलेच आप्पा.”

हेही वाचा… भररस्त्यात फेकले पैसे अन्…, सोशल मीडिया इन्फ्लूएन्सरचा जीवघेणा स्टंट; VIDEO पाहून नेटकरी संतप्त

दरम्यान, याआधीही सोशल मीडियावर अशी अनेक गाणी व्हायरल झाली आहेत, त्यात ‘तांबडी चांबडी चमकते उन्हात’ हे गाणंदेखील नुकतंच व्हायरल झालं होतं.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Appacha vishay lay hard hai viral video elderly man swag video with dog on bike dvr