Appa Cha Vishay Lay Hard Hai: सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल काही सांगता येतनाही. इन्स्टाग्रामवर दररोज ट्रेंड बदलत असतात. कधी गुबाली साडी तर कधी चिन टपाक डम डम ऐकून येतं. या सगळ्यांना मागे टाकत सध्या आप्पांनी विषय हार्ड केला आहे. आप्पाचा विषय लय हार्ड आहे हे गाणं सध्या इन्स्टाग्राम रील्सवर चांगलाच वाजतंय. नेटकरी ‘आप्पाचा विषय हार्ड आहे’ वर रील्स करताना दिसत आहेत. दरम्यान या ट्रेंडमध्ये आता मुंबई पोलीसही मागे नाहीत. मुंबई पोलिसांनीही या ट्रेंडच्या माध्यमातून जनजागृती केली आहे. मुंबई पोलिसांचीही क्रिएटिव्हिटी पाहून तुम्हीही पोट धरुन हसाल..
“आप्पाचा विषय लय हार्ड ए” हे गाणं तुम्हीही ऐकलं असेल. सध्या या गाण्यावर लहान मुलांपासून वृद्ध लोकांपर्यंत अनेक जण मजेशीर रिल बनवताना दिसताहेत. सध्या हे गाणं चांगलेच व्हायरल होत आहे. पण तुम्हाला माहितीये का? कोण आहे व्हायरल गाण्याचा गायक?
‘अप्पाचा विषय हार्ड’ कोणी केला? कोण आहे या व्हायरल गाण्याचा गायक
आप्पाचा विषय लय हार्ड आहे हे एक रॅप साँग आहे. वरदान नावाच्या इन्स्टाग्राम आणि युट्यूब चॅनेलवर हे गाणं रिलीज करण्यात आलं आहे. ऋषी भोसले नावाच्या एका कलाकारानं हे रॅप साँग तयार केलं आहे. आप्पाचा विषय लय हार्ड आहे हे गाणं सध्या सोशल मीडियावर ट्रेंडमध्ये आहेत. ऋषी भोसले यांनं याआधी देखील अनेक रॅप साँग बनवले. पण आप्पाचा विषय लय हार्ड आहे हे त्याचं रॅप चांगलंच हिट झालं आहे.
मुंबई पोलिसांची क्रिएटिव्हिटी
“आप्पाचा विषय लय हार्ड आहे, आप्पाकडे क्रेडिटचं कार्ड आहे, आप्पाचं घरात नाय ध्यान पण आप्पाचे बाहेर लय लाड आहे”, असे त्या गाण्याचे शब्द आहेत.मात्र मुंबई पोलिसांनी यातच थोडी क्रिएटिव्हिटी करुन जनजागृती केली आहे. मुंबई पोलिसांनी अशी काय क्रिएटिव्हिटी केली पाहा. आप्पाचा विषय लय हार्ड ए , आप्पांकडे क्रेडिटचं कार्ड ए..आप्पांकडे मागितला OTP पण, आप्पांना सायबर सेफ्टीचं ज्ञान ए..अशी पोस्ट मुंबई पोलिसांनी केलीय.
पाहा मुंबई पोलिसांची क्रिएटिव्हिटी
हेही वाचा >> काळाचौकीच्या आगमनाला वाजवलं असं गाण की सगळेच संतापले; VIDEO व्हायरल होताच सोशल मीडियावर जोरदार टीका
मुंबई पोलिसांनी त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन ही पोस्ट केली असून कॅप्शनमध्येही “आप्पांचे Cyber Safety वर ध्यान आहे, म्हणून आप्पांचा घरात लय लाड आहे..” असं लिहलं आहे.मुंबई पोलीस नेहमीच त्यांच्या रंजक सोशल मीडिया पोस्टमुळे चर्चेत असतात. जनजागृतीसाठी अगदी मिम्सपासून ते भन्नाट रिप्लायपर्यंतच्या गोष्टी मुंबई पोलिसांच्या अधिकृत सोशल मीडिया हॅण्डलवरुन केल्या जातात. मुंबई पोलिसांच्या या भन्नाट पोस्ट आणि रिप्लाय नेटकऱ्यांना फारच आवडतात.