Tim Cook’s Diwali Wishes : सध्या देशात मोठ्या उत्साहात दिवाळी साजरी केली जात आहे. सोशल मीडियावर दिवाळीच्या शुभेच्छांचा वर्षाव होत आहे पण सध्या एका दिवाळीच्या शुभेच्छांनी सर्वांचे लक्ष वेधले आहे. Apple कंपनीचे सीईओ टीम कुक यांनी दिवाळीच्या हटके शुभेच्छा दिल्या आहेत. सध्या त्यांची पोस्ट सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली आहे. (Tim Cook’s Diwali Wishes Go Viral: Heartfelt Message with Beautiful Diyas Photo clicked by an Indian photographer)

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

टीम कुक यांनी दिल्या दिवाळीच्या हटके शुभेच्छा

टीम कुक यांनी त्यांच्या एक्स अकाउंटवरून दिवाळीच्या हटके शुभेच्छा दिल्या. त्यांनी सुंदर दिव्यांचा फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिलेय, “दिवाळी हा प्रकाश, एकता आणि आशेचा सण आहे. आनंद आणि शांततामय दिपोत्सव साजरा करणाऱ्या सर्वांना शुभेच्छा! रोहित वोहराने iPhone 16 Pro Max हा फोटो काढला आहे.”

प्रसिद्ध भारतीय फोटोग्राफर रोहित वोहराने काढलेला हा सुंदर फोटो टीम कुक यांनी शेअर केल्यामुळे सोशल मीडियावर त्यांची पोस्ट तुफान व्हायरल होत आहे.

हेही वाचा : इथे माणुसकी मेली! पतीचा गोळीबारात मृत्यू, गरोदर पत्नीला रक्त साफ करण्यास भाग पाडलं; VIDEO पाहून अंगावर येईल काटा

पाहा व्हायरल पोस्ट

रोहित वोहराची प्रतिक्रिया

रोहित वोहराने सुद्धा rohit_apf’ या त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून टीम कुक यांच्या पोस्टचा फोटो शेअर करत आभार मानले आहे. रोहित लिहितो, “या दिवाळीत टीम कुक यांनी माझा फोटो शेअर करणे माझ्यासाठी सन्मानाची बाब आहे. सर्वांना दिवाळी आनंदाची आणि भरभराटीची जावो.”

पाहा व्हायरल पोस्ट

हेही वाचा : VIRAL VIDEO : ‘प्रत्येक बायकोचं स्वप्न…’, दिवाळीनिमित्त दिलं हटके गिफ्ट; बारीक-सारीक गोष्टी लक्षात ठेवणाऱ्या नवऱ्याचं होतंय कौतुक

या दोन्ही पोस्टवर भारतीयांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. अनेक भारतीय युजर्सनी टीम कुक यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहे. काही युजर्सनी रोहित वोहराच्या फोटोवर सुंदर प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “खूप सुंदर फोटो काढला आहे.” तर एका युजरने लिहिलेय, “अभिनंदन रोहित वोहरा. खूप सुंदर फोटो काढला आहे. माझ्याकडे पण हाच फोन आहे.”

सध्या भारतात Apple कंपनी विक्रमी कमाई करत आहे. iPhone च्या विक्रीमध्ये मोठी वाढ झाली आहे. विक्रीमध्ये झालेली वाढ पाहताच टीम कुक यांनी भारतात आणखी ४ नवीन अॅपल स्टोअर्स उघडण्याची घोषणा केली आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Apple ceo tim cook give diwali wishes with an photo of diyas clicked by an indian photographer post goes viral ndj