अ‍ॅपलचे सह-संस्थापक स्टीव्ह जॉब्स यांच्या सॅण्डल्सला तब्बल एक कोटी ७० लाखांची बोली एका लिलावात लावण्यात आली. ब्रिकेनस्टॉक कंपनीच्या या लेटर सॅण्डलची मूळ किंमत ही २०० अमेरिकी डॉलर्स म्हणजेच जवळपास १६ हजार रुपये इतकी असल्याचं सांगितलं जात आहे. या सॅण्डलची २ लाख १८ हजार ७५० अमेरिकी डॉलर्सला एका लिलावामध्ये विक्री करण्यात आली. म्हणजेच भारतीय चलनानुसार ही रक्कम आजच्या घडीला १ कोटी ७० लाख डॉलर्स इतकी होते. मात्र या सॅण्डल्स नेमक्या कोणी विकत घेतल्या आहेत याबद्दलची माहिती लिलाव करणाऱ्या ‘ज्यूलीयन्स ऑक्शन्स’ कंपनीने दिलेली नाही.

या लिलावामध्ये फोटोग्राफर सॅण्डल्सचा एफटी फॉरमॅटमधील फोटोबरोबरच लेखक जेनर पिगोझीच्या यांची स्वाक्षरी असलेलं ‘द २१३ मोस्ट इम्पॉरटंट मॅन इन माय लाइफ’ या पुस्तकाचाही लिलाव करण्यात आला. या पुस्तकामध्ये स्टीव्ह जॉब्स यांच्या कार्याची माहिती देण्यात आलेली आहे.

Loksatta explained What is the reason for the dissatisfaction of gig workers
‘गिग’ कामगारांनी साजरी केली ‘काळी दिवाळी’! त्यांच्या असंतोषाचे कारण काय? सामाजिक सुरक्षेचा लाभ किती?
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
mallikarjun kharge criticize pm narendra modi in nagpur
पंतप्रधान देशाचे असतात, पण मोदी मात्र सर्व चांगले प्रकल्प आपल्याच गृहराज्यात…खरगेंची जोरदार टीका
Marathi Rangbhoomi Divas , Marathi Theatre Day, 5th November
विश्लेषण : रंगभूमी दिन ५ नोव्हेंबरला का असतो? यंदा अद्याप साजरा का झाला नाही?
guruji Nitesh Karale concern over giving opportunity to mp Kale wife Mayura Kale in Maharashtra
Video : कराळे गुरूजींची स्वपक्षीय खासदाराबद्दल ‘खदखद’,काय म्हणाले  ?
pm modi said ek hai toh safe
योगींच्या ‘बटेंगे तो कटेंगे’नंतर पंतप्रधान मोदींकडून ‘एक हैं तो सेफ है’चा नारा
Nitin chauhan death reason
काम मिळत नसल्याने अभिनेत्याने उचललं टोकाचं पाऊल, पत्नी-मुलगी घरात नसताना गळफास घेऊन संपवलं आयुष्य
desi jugaad room heater made of brick
देसी जुगाड! थंडीपासून वाचण्यासाठी पठ्ठ्याने विटेपासून बनवला रुम हीटर; Video पाहून युजर्स शॉक, म्हणाले, “मृत्यूला…”

‘ज्यूलीयन्स ऑक्शन्स’च्या वेबसाईटनुसार स्टीव्ह जॉब्स यांनी या सॅण्डल्स १९७० ते १९८० च्या दशकांमध्ये वापरल्या आङेत. तसेच स्टीव्ह यांनी या सॅण्डल्स वापरण्याआधी त्यांच्या घरातील व्यवस्थापक मार्क शेरीफ या सॅण्डल्स वापरायचे, अशीही माहिती वेबसाईटवर आहे.

अ‍ॅपलच्या ऐतिहासिक वाटचालीचे सर्वात मोठे आणि महत्त्वाचे साक्षीदार ठरलेल्या जॉब्स यांनी अनेक कार्यक्रमांमध्ये या सॅण्डल्स घातल्या होत्या असाही उल्लेख वेबसाईटवर आहे. “लोस अल्टोज येथील गॅरेजमध्ये पहिल्यांदा जेव्हा अ‍ॅपलचे सह-संस्थापक रहिलेल्या स्टीव्ह यांनी स्टीव्ह व्होझनिक यांच्यासमवेत असताना अनेकदा या सॅण्डल्स वापरल्या आहेत. या कंपनीच्या चपला दिर्घकाळ चालतात हे समजल्यानंतर जॉब्स या कंपनीच्या प्रोडक्टसच्या प्रेमात पडले होते,” असं वेबसाईटवर म्हटलं आहे.

याशिवाय या सॅण्डल्स आतापर्यंत वेगवेगळ्या प्रदर्शनांमध्येही ठेवण्यात आल्या होत्या. इटलीमधील मिलान येथे २०१७ साली आयोजित केलेल्या सॅलॉन डेल मोबाईल या प्रदर्शनामध्ये या सॅण्डल्स ठेवण्यात आलेल्या. तसेच ब्रिकनस्टॉक कंपनीच्या जर्मनी येथील ऱ्हाम्स येथील मुख्यालयामध्ये त्याच वर्षी आयोजित करण्यात आलेल्या प्रदर्शनातही या सॅण्डल्स होत्या.