अनेक वेळा तुम्ही टीव्हीवर किंवा वृत्तपत्रामध्ये पाहिले असेल की जुन्या गोष्टींचा ज्याची किंमत ही अनेक कोटींमध्ये, लाखांमध्ये असते त्या गोष्टींचा लिलाव करण्यात येतो. मात्र तुम्ही कधी विचार केला आहे का की ४७ वर्ष जुन्या कागदाची किंमत लाखात असू शकते का? अॅपलचे सहसंस्थापक स्टीव्ह जॉब्स यांनी सही केलेला चेकची लिलावामध्ये विक्री करण्यात आली. या चेकची विक्री तब्बल $१०६,९८५ म्हणजेच तब्बल ८७ लाख ९३ हजार रुपयांना या चेकचा लिलाव करण्यात आला. सर्वात महत्वाचे म्हणजे या चेकवर जी रक्क्म भरण्यात आली होती ती केवळ $१७५ म्हणजे जवळजवळ १४ हजार रूपये इतकी होती. या चेकमध्ये असे काय आहे ते जाणून घेऊयात.
स्टीव्ह जॉब्स यांनी सही केलेला हा चेक RR द्वारे आयोजित करण्यात आलेल्या लिलावामध्ये $ १०६,९८५ मध्ये विकण्यात आला. हा लिलाव १७ एप्रिलपर्यंत सुरु होता. त्या चेकवर लिहिलेली किंमत ही केवळ $१७५ म्हणजेच १४ हजार आहे. म्हणजेच हा १४ हजार किंमत असणारा हा चेक कितीतरी जास्त पटींनी कोणीतरी विकत घेतला आहे. हा चेक ४७ वर्षांपूर्वीचा आहे. Apple चे सहसंस्थापक स्टीव्ह जॉब्स यांनी हा चेक १९७६ मध्ये भरला होता. हा चेक क्रॅम्प्टन, रेमके अँड मिलर, इंक या कंपन्यांसाठी भरण्यात आला होता. ज्या उत्तर कॅलिफोर्नियामधील टेक कंपन्यांना सेवा पुरवतात. याबाबतचे वृत्त Macrumors ने दिले आहे.
या चेकचे वैशिष्ट्य असे आहे की त्यात Apple च्या पहिल्या ऑफिसचा मूळ पत्ता देण्यात आला आहे. “770 Welch Rd., Ste. 154, Palo Alto” हा Apple च्या पहिल्या ऑफिसचा मूळ पत्ता होता. हा Apple चा पहिला अधिकृत पत्ता आहे. या चेकचे वैशिष्ट्य असे आहे की त्यात Apple च्या पहिल्या ऑफिसचा मूळ पत्ता देण्यात आला आहे. “770 Welch Rd., Ste. 154, Palo Alto” हा Apple च्या पहिल्या ऑफिसचा मूळ पत्ता होता. हा Apple चा पहिला अधिकृत पत्ता आहे. तेव्हा या ऑफिसमधून कंपनीसाठी उत्तरे देणारी आणि मेल ड्रॉप करणे अशी कामे केली जात असत.
या वर्षी झाली Apple ची सुरुवात
Apple चे सहसंस्थापक स्टीव्ह जॉब्स यांनी हा चेक १९७६ मध्ये भरला होता. हा चेक क्रॅम्प्टन, रेमके अँड मिलर, इंक या कंपन्यांसाठी भरण्यात आला होता. तेव्हा कंपनीचे नाव हे Apple Computer, Inc. होते. Apple कंपनीची सुरुवात Steve Jobs आणि Steve Wozniak यांनी केली होती.
हेही वाचा : VIDEO: WearOS स्मार्टवॉचवर WhatsApp कसे डाउनलोड करायचे? फॉलो करा ‘या’ सोप्या स्टेप्स
RR ऑक्शनचे VP बॉबी लिव्हिंगस्टन म्हणाले, असे खूप सुरुवातीच्या काळातले चेक मिळणे अत्यंत अवघड आहे. कारण हा चेक केवळ Apple च्या स्थापनेबद्दल सांगत नाही तर स्टीव्ह जॉब्स यांच्या सहीचे एक उत्तम उदाहरण आहे.
Apple ही टेक कंपनी आहे. याचे मुख्य कार्यालय हे अमेरिकेतील कॅलिफोर्नियामध्ये आहे. ही कंपनी इलेक्ट्रॉनिक्स, संगणक सॉफ्टवेअर आणि ऑनलाइन सेवा डेव्हलप करते आणि त्याची विक्री करते. तसेच कंपनी आयफोन ,आयफोन स्मार्टफोन, आयपॅड टॅब्लेट कम्प्युटर, मॅक पर्सनल कॉम्प्युटर, आयपॉड पोर्टेबल मीडिया प्लेअरचे देखील उत्पादन करते. आता बऱ्याच टेक कंपन्यांमध्ये आर्थिक मंदीचे कारण देत कर्मचारी कपात सुरु आहे. Apple ने देखील आपल्या काही कर्मचाऱ्यांची कपात केली आहे.