गेल्या काही काळात ‘पब्जी’, ‘नीड फॉर स्पीड’, ‘ट्राफीक टूर’, ‘एसफाल्ट’, ‘कंडिशन झीरो’ यांसारख्या हाय ग्राफीक व्हीडीओ गेम्सने गेमिंग विश्व व्यापून टाकले आहे. हे गेम्स खेळण्यासाठी आजवर आपल्याला स्मार्ट फोन्स किंवा कंप्यूटर्सवर अवलंबून राहावे लागत होते. परंतु हार्डकोर गेमर्ससाठी आता आणखीन एक पर्याय उपलब्ध झाला आहे. अॅपल कंपनीने आपला नवा आय पॉड बाजारात आणला आहे. जबरदस्त बॅटरी, हाय ग्राफीक आणि हेवी स्टोरेजची क्षमता असलेला हा आय पॉड प्रामुख्याने गेमिंगसाठी तयार करण्यात आला आहे.

अॅपल कंपनीने गेल्या चार वर्षांत लॉन्च केलेला हा पहिला आयपॉड आहे. कुठलेही गेमिंग डिव्हाईज हे प्रामुख्याने वेग आणि अचूकता यासाठी ओळखले जाते. अॅपलनेही वापरकर्त्यांची हीच गरज लक्षात ठेऊन त्यात A -10 Fusion chip वापरण्यात आली आहे. यामुळे गेमिंगची मजा आता आणखीन द्विगुणीत होईल.

काय आहेत स्पेसीफिकेशन ?

  • हा आयपॉड 32 GB, 128 GB व 256 GB या तीन स्टोरेज व्हेरिएंटमध्ये उपलब्ध होणार आहे.
  • 32 GB ची किंमत 13 हजार 892 रुपये आहे.
  • 128 GB ची किंमत 20 हजार 800 रुपये आहे.
  • 256 GB ची किंमत 34 हजार 800 रुपये आहे.
  • यामध्ये चार इंचाचा 1136 x 640 रेझॉल्युशन असलेला फुल स्क्रीन रॅटिना डीस्प्ले देण्यात आला.
  • 8 मेगापिक्सल रिअर आणि 1.2 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा आहे.
  • ग्रे, व्हाईट, गोल्ड, ब्लू, पिंक, रेड या विविध रंगामध्ये हे डिव्हाईज उपलब्ध होणार आहे.
  • 88 ग्रॅम याचे वजन आहे.
  • यांत आपण आर्टिफीशीअल रिअॅलीटी बरोबरच ऑगमेंटेड रिअॅलीटीचाही वापर करून गेमिंगची मजा घेऊ शकतो.

Story img Loader