फिटनेस आणि फॅशनशी संबंधित ट्रेंडमुळे स्मार्टवॉच वापरणाऱ्या लोकांची संख्या झपाट्याने वाढली आहे. तसंच, वेळ पाहणे आणि फिटनेस-संबंधित डेटा दर्शविण्याव्यतिरिक्त, हे स्मार्ट वेअरेबल एका माणसाचा जीव देखील वाचवू शकतात. या संबंधित नवीन प्रकरण समोर आले आहे. ज्यामुळे लंडनमध्ये राहणाऱ्या एका तरुणाला हृदयविकाराचे निदान झाले आणि त्याचा जीव वाचू शकला. अॅपल वॉचमध्ये सापडलेल्या ईसीजी सेन्सरच्या मदतीने हे शक्य झाले.
अॅपल वॉचने यूकेमध्ये राहणाऱ्या ५४ वर्षीय डेव्हिड लास्टला अलर्ट देऊन दाखवून दिले की त्याच्या हृदयाची गती सुमारे ३००० पटीने कमी आहे. द इंडिपेंडंटच्यारिपोर्टनुसार , हॉस्पिटलमध्ये ४८ तासांच्या चाचणी कालावधीत डेव्हिडच्या हृदयाचे ठोके सुमारे १३८ वेळा थांबले. नंतर असे आढळून आले की त्यांच्या हृदयात मोठा ब्लॉकेज आहे, त्यामुळे त्यांचा जीव जाऊ शकतो. डेव्हिडच्या ह्दयाची गती ३० बीट प्रति मिनिट पर्यंत कमी होत होती, तर त्याची सामान्य श्रेणी ६० ते १०० बीट प्रति मिनिट दरम्यान आहे.
( हे ही वाचा: सिंहणींच्या कळपाने एका झटक्यात केली बिबट्याची शिकार; व्हायरल व्हिडीओ पाहून तुमचाही थरकाप उडेल)
सुमारे ४८ तासांच्या ईसीजी आणि नंतर एमआरआयसारख्या चाचण्यांनंतर डेव्हिडच्या हृदयाचे ठोके थांबण्याचे आणि मंद होण्याचे कारण समजले. त्याच्या हृदयात मोठा ब्लॉकेज असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. गेल्या महिन्यात डेव्हिडवर शस्त्रक्रिया करण्यात आली आणि त्याच्या हृदयाचे ठोके सामान्य राहण्यासाठी आणि सध्याच्या धोक्यापासून मुक्त होण्यासाठी त्याच्या शरीरात पेसमेकर लावण्यात आला.
अॅपल वॉच पत्नीने तिच्या वाढदिवशी भेट दिली होती
डेव्हिडला एप्रिलमध्ये त्याच्या वाढदिवशी त्याच्या पत्नीकडून भेट म्हणून अॅपल वॉच मिळाले होते, त्यानंतर त्याला असामान्य हृदय गती संबंधित अलर्ट मिळू लागले. नंतर त्याने सांगितले, “जर तिने माझ्या वाढदिवशी मला अॅपल घड्याळ भेट दिली नसती, तर मी आज येथे नसतो. यासाठी मी तिचा सदैव ऋणी राहीन. मी फक्त ऍपल वॉच चार्जिंगसाठी बाहेर ठेवेल आणि उर्वरित वेळ घालेन.”
( हे ही वाचा: Viral Video: लग्न जेवणात पापड मिळाला नाही म्हणून वराच्या मित्रांनी केला भयानक प्रकार; व्हिडीओ पाहून तुम्हीही हैराण व्हाल)
अॅपल प्रगत आरोग्य वैशिष्ट्यांशी संबंधित अपडेट प्रदान करेल
अॅपल वॉचने याआधीही अनेक प्रकरणांमध्ये युजर्सचे प्राण वाचवले आहेत. iOS 16 आणि WatchOS 9 अपडेट्ससह, त्यात अनेक नवीन फीचर्स समाविष्ट केले जातील. हे घड्याळ आरोग्य आणि फिटनेसशी संबंधित १७ पॅरामीटर्सचे निरीक्षण करेल. हे हृदयाचे आरोग्य, झोप, महिलांचे आरोग्य आणि इतर फिटनेस-आधारित ट्रॅकर्ससाठी चांगल्या प्रकारे वापरले जाईल.