लोकांना ‘फूल’ बनवण्याचा दिवस अर्थात १ एप्रिल येऊन ठेपला आहे. आपण हा दिवस तर लोकांना मूर्ख बनवत साजरा करतोच. पण हा दिवस नक्की काय आहे, याच दिवशी लोकांना मूर्ख बनवण्यासाठी का उत्तेजन दिलं जातं अशा अनेक गोष्टी लोकांना माहीत नसतात. पाहुयात एप्रिल फूलच्या दिवसाशी संबंधित असलेल्या काही मजेदार फॅक्टस्

१. एप्रिल फूलच्या दिवसाची सुरूवात

Maharashtrachi Hasyajatra Fame Prasad Khandekar share special post for wife
“चाळीतून वन रुम किचनमध्ये…”, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम प्रसाद खांडेकरने बायकोसाठी केली खास पोस्ट; म्हणाला, “तुझ्या साथीने…”
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Annual flower exhibition detail update
निसर्गलिपी : फुलांच्या वार्षिक प्रदर्शनांना जाच!
Viral Video Of Little Girl
‘साजन जी घर आये’ गाणं वाजताच टेरेसवर ‘तिनं’ धरला ठेका; चिमुकलीचा व्हायरल VIRAL VIDEO एकदा बघाच
Fire at birthday party girl shocking video viral on social media
केकवर मेणबत्ती लावली अन् होत्याचं नव्हतं झालं; वाढदिवस साजरा करताना तुम्हीही ‘ही’ चूक करता का? मग हा VIDEO नक्की पाहा
Mangal Vakri 2025
मंगळ देणार पैसा, प्रेम अन् प्रसिद्धी; नव्या वर्षाच्या सुरूवातीला ‘या’ तीन राशींना मिळणार प्रत्येक कामात यश
kareena Kapoor
“आतापर्यंतची सर्वात कूल गँगस्टर…”, करीना कपूरच्या शर्मिला टागोरांना वाढदिवसाच्या हटके शुभेच्छा; म्हणाली, “माझ्या सासूबाईंना…”
Lagnanantar Hoilach Prem New Promo
लग्नानंतर होईलच प्रेम : ‘या’ तामिळ मालिकेचा रिमेक, मृणालचं कमबॅक अन्…; पाहा जबरदस्त नवीन प्रोमो

याविषयी अनेक मतंमतांतरं अाहेत. पण हा दिवस साजरा करायला १५८२ मध्ये सुरूवात झाली असं म्हणतात. आधुनिक काळात आपण जे कॅलेंडर वापरतो त्याला ग्रेगेरियन कॅलेंडर म्हणतात. पण हे कॅलेंडर पाश्चिमात्य देशांमध्येही आधी कायमचं रूढ नव्हतं. याआधी वापरण्यात येणाऱ्या कॅलेंडरला ज्यूलियन कॅलेंडर म्हणतात. युरोपमध्ये १५८२ मध्ये ज्यूनियन कॅलेंडर बदलून ग्रेगेरियन कॅलेंडर रूढ झालं. नवं कॅलेंडर रूढ होऊनसुध्दा युरोपमध्ये जे लोक जुनं कॅलेंडर वापरत होते त्यांच्या् होणाऱ्या गोंधळाचं मजेशीर वर्णन करण्याच्या हेतूने एप्रिल फूलचा दिवस रूढ झाला असं सांगण्यात येतं.

२. आणखी एक ‘फूल’ दिवस

स्पेन आणि दक्षिण अमेरिकेमध्ये परंपरागतरीत्या १ एप्रिलला हा दिवस साजरा केला जात नाही. तिथे २८ डिसेंबरला असा दिवस साजरा करण्याची प्रथा आहे.

३. ‘एप्रिल फूल’चा दिवस ब्रिटिशांनी लोकप्रिय केला.

एप्रिल फूलचा दिवस लोकप्रिय करण्यामागे ब्रिटिश जनता आहे. अठराव्या शतकापासून ब्रिटिश जनतेत हा दिवस साजरा करण्याची प्रथा आहे.

४. एप्रिल फूलचा ‘स्विडिश’ जोक

१९६० च्या दशकात स्वीडनमध्ये फक्त एकच टीव्ही चॅनल होतं. त्याचं प्रक्षेपण ब्लॅक अँड व्हाईट स्वरूपात केलं जाई. या चॅनलने एका वर्षी आपण रंगीत होणार असल्याचं जाहीर केलं. आपल्या टीव्ही स्क्रीनसमोर एक मोठा साॅक्स लावला की हे चॅनल रंगीत दिसणार असल्याचं चॅनलने जाहीर केलं. स्वीडनमधले कितीतरी लोक या जोकला बळी पडले.

५. बीबीसीवर ‘एप्रिल फूल’

१९५० च्या दशकात बीबीसीने स्वित्झर्लंडमध्ये नूडल्सची शेती होत असल्याची बातमी एप्रिल फूलचा जोक म्हणून प्रसारित केली.

६. ‘टाको लिबर्टी बेल’

भारतातल्या शहरांमध्ये लोकप्रिय असणाऱ्या ‘टाको बेल’ या अमेरिकन फास्टफूड चेनने अनेकदा आपण अमेरिकेची ‘लिबर्टी बेल’ खरेदी करत असून त्या बेलचं नाव आपण ‘टाको लिबर्टी बेल’ असं करत असल्याचं जाहीर केलं. लिबर्टी बेल ही एक खरीखुरी घंटा असून अमेरिकन स्वातंत्र्ययुध्दाच्या इतिहासाशी तिचं नातं जोडलं गेलं आहे.

७. गूगल ‘माईक ड्राॅप’

गेल्या वर्षी गूगलने ‘माईक ड्राॅप’ हे मजेदार फीचर आणलं होतं. यावर क्लिक केल्याने तुम्हाला कार्टून कॅरेक्टरतं अॅनिमेशन असणारी ई-मेल पाठवण्यात येत होती. या फीचरचा वापर करत बिझनेस ई-मेल पाठवणाऱ्यांची चांगलीच भंबेरी उडाली होती.

८. जीमेल एप्रिल फूल

गूगलने ‘जीमेल’या त्यांच्या सर्व्हिसची सुरूवात १ एप्रिल २००४ साली केली होती. त्यावेळी ईमेल ‘इनबाॅक्स’ची क्षमता १० एमबी च्या आसपास असायची. अशावेळी १ जीही मेलबाॅक्स क्षमता देणारी जीमेल हा त्यावेळी गूगलने केलेला एप्रिल फूलचा जोक आहे अशी समजूत बऱ्याच जणांची झाली होती.

९. ‘नासा’चा एप्रिल फूल प्रँक 

२००२ मध्ये ‘नासा’ने चंद्राचे काही फोटो प्रकाशित करत चंद्र हा चीजचा बनलेला असल्याचे पुरावे आपल्याला मिळाल्याचं जाहीर केलं होतं

१०. ज्वालामुखी जोक

१९७४ साली अलास्कामधल्या एका ज्वालामुखीमध्ये एका माणसाने ७० टायर्स आणून जाळले. त्यामुळे आसपासच्या रहिवाशांमध्ये हा ज्वालामुखी पुन्हा फुटत असल्याची समजूत पसरत घबराट माजली.

मग? आहे का तुमचं डोकं एवढं सुपीक? तुमच्या नातेवाईकांना, मित्रांना आणि आॅफिसच्या सहकाऱ्यांना मूर्ख बनवण्यासाठी काही युक्ती आहे तुमच्याकडे? नसेल तर खालचा लेख वाचा

April Fool’s Day 2017: सगळ्यांना ‘फूल’ करण्याच्या काही ट्रिक्स

आणि सगळ्यांना आमच्या तर्फे ‘एप्रिल फूल डे’ च्या शुभेच्छा! (असा प्रकारही असतो का? चलो ठीक है)

Story img Loader