ग्रीसमधल्या पुरातत्व विभागाला अखेर हरवलेल्या ‘त्या’ नगरीचा शोध घेण्यात यश आले आहे. ‘लॉस्ट सीटी’ म्हणून ओळखल्या जाणा-या या नगरीचा ग्रीस, युके येथल्या पुरातत्व तज्ज्ञ शोध घेत होते. गेल्या काही महिन्यांपासून अथेन्सपासून काही किलोमीटर दूर अंतरावर उत्खनन सुरू होते. अखेर अनेक महिन्यांच्या प्रयत्नानंतर अडीच हजार वर्षे जुन्या नगरीचा शोध लावण्यात यश आले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

VIDEO : लग्नात पैशांची उधळपट्टी करण्यापेक्षा वधुच्या पित्याने गरिबांसाठी बांधली मोफत घरे

नव्याने शोध लागलेले हे ठिकाण उत्तर अथेन्सपासून ३०० किलोमीटर अंतरावर आहे. सप्टेंबर महिन्यात पुरातत्व विभागाला इसवी सन पूर्व ५०० शतकातील जुनी मातीची भांडी आणि काही नाणी सापडली होती. ग्रीस, युके येथल्या पुरातत्व तज्ज्ञ गेल्या काही महिन्यांपासून या भागात उत्खनन करत होते. त्यामुळे त्यांना आता अडीच हजार वर्षांपूर्वीच्या जून्या शहराचे काही अवशेष सापडले आहेत. या परिसरात उत्खनन व्हायचे आहे. तेव्हा भूतकाळात हरवलेल्या या ग्रीसच्या इतिहासाच्या आणखी महत्त्वाच्या खुणा सापडण्याची शक्यता आहे.

काही दिवसांपूर्वी ७ हजार वर्षांपूर्वी जमीनीखाली गाढल्या गेलेल्या इजिप्तमधील शहराचा शोध लागला होता. प्राचीन इजिप्तमधल्या अबॉयदस शहराचा हा महत्त्वाचा भाग समजला जातो. येथे या शहाराची नगर रचना करण्यात मोलाचे योगदान देणा-या कामगारांच्या वस्त्या असू शकतात असा तर्क मांडण्यात येत आहे. अबॉयदस ही प्राचीन काळी इजिप्तची राजधानी होती असे अनेकांचे ठाम मत आहे. नव्याने शोधलेल्या या शहरात कदाचित शहरातील प्रमुख अधिका-यांची किंवा पिरॅमिड बांधणा-यांची घरे असल्याचे पुरातत्व विभागाने सांगितले आहे. तसेच या खोदकामादरम्यान १५ कबर देखील सापडल्या आहे. अबॉयदसच्या राजाच्या कबरेपेक्षाही या कबरींचे आकारमान हे मोठे आहे अशी माहितीही पुरातत्व विभागाने दिली आहे. त्यामुळे या ठिकाणी इजिप्तमधल्या कदाचित उच्च स्थानावर असलेल्या व्यक्तींना पुरण्यात आले असल्याचा अनुमान लावण्यात आला आहे. नाईल नदीच्या किना-यावर असलेल्या लक्सर शहरातील सेती मंदिरापासून ४०० किलोमीटर अंतरावर या शहराचा शोध लागला आहे.

वाचा : एक ग्लास पुदिन्याच्या पाण्याचा असाही फायदा