Viral Video : सोशल मीडियावर अनेक थक्क करणारे व्हिडीओ व्हायरल होत असतात. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये दिग्गज अभिनेते अमिताभ बच्चन हातात फावडे घेऊन खोदकाम करताना दिसत आहे.
हा व्हिडीओ पाहून तुम्हीही अचंबित व्हाल आणि तुम्हाला विश्वास बसणार नाही. जेव्हा तुम्ही व्हिडीओ नीट पाहाल तेव्हा तुम्हाला कळेल की या व्हिडीओमध्ये अमिताभ बच्चन नाही तर त्यांचा डुप्लीकेट आहे.
सध्या या व्हिडीओची चांगलीच चर्चा सुरू आहे.
दिग्गज लोकांचे अनेक डुप्लीकेट आपल्याला सोशल मीडियावर दिसतात.अशातच अमिताभ बच्चन यांचा सुद्धा एक अतिशय लोकप्रिय डुप्लीकेट आहे.त्यांचे नाव शशिकांत पेडवाल आहे.
हेही वाचा : VIDEO : नऊवारी साडी कशी नेसायची? दिवाळीत करा पारंपारिक लूक, पाहा व्हायरल व्हिडीओ
या व्हायरल व्हिडीओमध्ये सुरुवातीला तुम्हाला दिसेल की अमिताभ बच्चन हातात फावडे घेऊन खोदकाम करताहेत पण नंतर तुमच्या लक्षात येईल की हे अमिताभ बच्चन नाही. अमिताभ बच्चन यांचा डुप्लीकेट नाव शशिकांत पेडवाल आहे. शशिकांत पेडवाल हे अमिताभ बच्चन सारखे दिसतात. त्यांना प्रति अमिताभ बच्चन म्हणून ओळखले जाते.
shashikant_pedwal या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन ते त्यांचे अनेक व्हिडीओ किंवा फोटो शेअर करत असतात. त्यांचे व्हिडीओ पाहून अनेकदा चाहते त्यांना अमिताभ बच्चन समजतात. त्यांचे इन्स्टाग्रामवर १.७ मिलियन फॉलोवर्स आहेत. त्यांच्या व्हिडीओवर किंवा फोटोवर चाहते कौतुकाचा वर्षाव करत असतात.