Suvichar In Marathi School : अनेक जण मराठी शाळेतून शिकलेली आहे. हल्ली इंग्रजी माध्यमाच्या शाळांची क्रेझ वाढत असली तरी मराठी माध्यमाच्या शाळेतली शिकवण ही आपल्याला कुठेही मिळणार नाही. अनेक अशा गोष्टी आहेत ज्या विद्यार्थ्यांना फक्त मराठी शाळेत अनुभवायला मिळतात. सोशल मीडियावर असे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात ज्या मराठी शाळेच्या आठवणी ताज्या करतात.सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक तरुणी मराठी शाळेत शिकलेल्या लोकांना प्रश्न विचारतेय. तिच्या प्रश्नावर लोक भन्नाट उत्तरे देताना दिसतात.

या व्हायरल व्हिडीओमध्ये एक तरुणी विचारतेय, “जर तुम्ही मराठी शाळेत शाळेतले असाल तर या रिलचा रिप्लाय तुम्हाला नक्की द्यावा लागेल तर मला सांगा फळ्यावर सर्वात जास्त लिहिला जाणारा सुविचार कोणता? आता हे म्हणू नका की ‘नेहमी खरे बोलावे’. हा सुविचार तर सर्वात जास्त लिहिलेला असायचाच पण या व्यतिरिक्त तुमच्या वर्गात लिहिला जाणारा सर्वात प्रचलित असणारा आणि सर्वात फेमस सुविचार कोणता? नक्की कमेंट करून सांगा”

boy and girl conversation my dreams joke
हास्यतरंग : माझी स्वप्न…
china lithium found concern in india
भारतासाठी धोक्याची घंटा? चीनमध्ये सापडला लिथियमचा मोठा साठा,…
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू

मराठी शाळेत फळ्यावर सुविचार लिहिलण्याची शिस्त होती. दर दिवशी एक विद्यार्थी किंवा वर्ग नायक फळ्यावर दिनविशेष आणि सुविचार लिहायचा. शाळेच्या दिवसातील अनेक सुविचार आजही आठवतात. काही सुविचार खूप लोकप्रिय होते. या व्हिडीओत तरुणीने विचारल्यानंतर तुम्हाला कोणता सुविचार आठवलाय?

हेही वाचा : जवानाने ‘स्वस्तिक’ पासून काढले सुंदर श्रीरामाचे चित्र, व्हिडीओ होतोय व्हायरल

@me_ashi_kashi या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “आपल्या मराठी शाळेत एक वेगळीच आपुलकी होती” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. नेटकऱ्यांनी एकापेक्षा एक प्रचलित सुविचार सांगितले आहेत. काही युजर्सनी लिहिलेय, “आळस हा माणसाचा शत्रू आहे” तर काही युजर्सनी लिहिलेय, “अपयश ही यशाची पहिली पायरी आहे” आणखी काही युजर्सनी लिहिलेय, “हसा खेळा आणि शिस्त पाळा” अनेक युजर्सनी शाळेच्या आठवणी सांगितल्या आहेत. युजर्सचे हे सुविचार ऐकून तुम्हालाही कदाचित तुमच्या शाळेच्या दिवसांची आठवण येऊ शकते.

Story img Loader