Tamilnadu Viral video: जन्मापासून मुलांना घडवणाऱ्या तीन प्रमुख संस्था आहेत. यामध्ये कुटूंब, आजूबाजूचा समाज आणि शाळा. शाळेत मुलं सर्वधिक वेळ घालवतात. शाळेत शिकलेल्या गोष्टींचा थेट परिणाम मुलांच्या मानसिकतेवर होतो. त्यामुळे शाळा निवडताना पालक योग्य तो निर्णय घेण्याचा प्रयत्न करतात. मात्र, जर शाळेतील शिक्षकच जर हिंसक असतील तर…‘छडी लागे छम छम, विद्या येई घम घम’चे दिवस जाऊन आता शाळांमधून हसत-खेळत शिक्षण प्रणाली राबवली जात आहे. परंतु, अजूनही काही शाळांमधील शिक्षकांकडून हिंसक वृत्तीने विद्यार्थ्यांना मारहाण केली जाते. तामिळनाडूमधील सेलम जिल्ह्यातील एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये फुटबॉल सामन्यात पराभव झाल्यानंतर प्रशिक्षकाने मुलांचे केस ओढून त्यांना लाथाबुक्क्यांनी तुडवलं आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही संताप येईल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘तुम्ही मुली आहात का रे?’

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, सगळी मुलं खाली जमिनीवर बसलेली दिसत आहेत. यावेळी हे प्रशिक्षक मुलांना अक्षरश: कानाखाली आणि लाथा-बुक्क्यांनी मारहाण करीत केस ओढताना दिसत आहेत. त्या प्रशिक्षकाने आपल्या हीन दर्जाच्या मानसिकतेचे दर्शन घडविले. व्हिडीओमध्ये हा प्रशिक्षक एका विद्यार्थ्याला विचारतोय, “तुम्ही पुरुष आहात की महिला? तुम्ही त्याला गोल कसा करू देऊ शकता. तुम्ही चेंडूला तुमच्यासमोरून कसे जाऊ दिले?” त्याने दुसऱ्या विद्यार्थ्याला प्रश्न केला, “तू दडपणाखाली खेळू शकत नाहीस का. तुमच्यात संवाद का नव्हता.” या शिक्षकाच्या कृतीवर नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.

कृत्यामुळे शिक्षक निलंबित

मुलगा आणि मुलगी अशी तुलना केल्याने सर्व स्तरांतून या शिक्षकावर टीका होत आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर संगागिरी जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांनी तपास सुरू केला आणि त्यानंतर शिक्षक अण्णामलाई याला त्याने केलेल्या कृत्याबद्दल दोषी ठरवीत निलंबित करण्यात आले आहे.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> पुणेकरांचा नाद नाय! गेट समोर गाडी पार्क करणाऱ्यांना दिली थेट धमकी; ‘ही’ पुणेरी पाटी वाचून पोट धरुन हसाल

एका युजरने म्हटले, “प्रशिक्षकाने योग्य मार्गदर्शन करणे अपेक्षित आहे.” दुसऱ्याने म्हटले आहे, “जर त्या मुलांच्या जागी माझा मुलगा असता, तर तो प्रशिक्षक आता हॉस्पिटलमध्ये असता.” तर तिसऱ्या युजरने “धडा शिकवण्याची ही भारतीय पद्धत आहे”, अशी प्रतिक्रिया दिली आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Are you man or a woman physical education teacher in tamil nadu beats up students over poor show in football match video viral srk
Show comments