पावसाळा सुरु झाला की वर्षाविहार करण्यासाठी धबधबे, किल्ले, धरण अशा ठिकाणी आवर्जून भेट देतात. पुण्याजवळ सिंहगड, खडकवासला धरण, ताम्हिणी घाट, लोणवळ्यातील भुशी धरण अशी काही मोजकी ठिकाणं आहेत जिथे पावसाळ्यात पुणेकर हमखास भेट देतात. विशेषत: शनिवार-रविवारी सुट्टी असेल मोठ्या संख्येने पर्यटक या ठिकाणांना भेट देतात. गेल्या काही वर्षांपासून या पर्यटळ स्थळानां भेट देण्याऱ्या लोकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे त्यामुळे पावसाचा आनंद घेण्यासाठी आलेले पर्यटक वाहतूक कोंडीमध्ये आणि लोकांच्या गर्दीमध्ये हरवून जातात. काही दिवसांपूर्वीच ताम्हिणी घाटातील व्हिडीओ व्हायरल झाला होता जिथे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. दरम्यान आता सिंहगडावरील असाच व्हिडीओ समोर आला आहे.

सिंहगड किल्ला

पुणे शहरापासून ३०-४० किमी अंतरावर असलेला, सह्याद्रीच्या पर्वतरांगामध्ये वसलेला सिंहगड किल्ला हा पुर्वी कोंढाणा नावाने ओळखला जात जातो. हवेली तालुक्यातील डोणजे गावात हा किल्ला आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचे विश्वासू आणि शूर सरदार तानाजी मालुसरे यांचे याच ठिकाणी मुघलांबरोबर युद्ध झाले. मुघलांपासून हा किल्ला वाचवण्यासाठी त्यांनी आपल्या जीवाची बाजी लावली. जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कानावर तानाजी यांच्या मृत्यूची बातमी पडली ते म्हणाले, “गड आला पण सिंह गेला” त्यानंतर त्यांनी कोढणा किल्याचे नाव बदलून सिंहगड असे नाव ठेवले.

ladies group dance on manmohana tu raja swapnatala marathi song video goes viral on social Media
“मनमोहना तू राजा स्वप्नातला…” मराठमोळ्या गाण्यावर महिलांनी केला जबरदस्त डान्स; VIDEO पाहून आठवतील जुने दिवस
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Shocking video Angry Hippopotamus Attacks Tourists At A Jungle Safari Animal Video Viral
सिंह-वाघापेक्षाही खतरनाक पाणघोड्याच्या नादाला लागले; जवळ जाताच केला खतरनाक हल्ला, VIDEO चा शेवट पाहून थरकाप उडेल
Gujarat suv car accidnet video viral
VIDEO : ढाब्यावर लोक जेवत असतानाच पाठीमागून भरधाव आली कार अन्…; थरारक लाइव्ह अपघात, सांगा चूक नक्की कुणाची?
Vasota Jungle Trek
मरणाची गर्दी! वासोटा ट्रेकला जाण्यापूर्वी हा VIDEO एकदा पाहाच
Auto driver written a message on back side of his auto goes viral on social media
“प्रेम एक कला पण…” रिक्षाच्या मागे पठ्ठ्यानं वयात येणाऱ्या तरुणाईला दिला सल्ला; PHOTO पाहून तुमचं मत नक्की सांगा
dance in kolhapur on marathi song halagi tune
“एकदा वय निघून गेलं की हा आनंद नाही” हलगीच्या तालावर मित्रांनी धरला ठेका; VIDEO पाहून म्हणाल नादच खुळा…
do you know which fort is this
हा कोणता किल्ला आहे, तुम्ही ओळखू शकता का? Viral Video एकदा पाहाच

हेही वाचा – पुणेकरांनो, विकेंडला ताम्हिणी घाटामध्ये फिरायला जाण्याचा बेत आखताय? थांबा….आधी हा Video बघा

सिंहगड ही ऐतिहासिक वास्तू आहे. पुणेकरांसाठी हाकेच्या अंतरावर असलेला या सिंहगडाला बाराही महिने पर्यटक भेट देण्यासाठी येतात. दरम्यान, पावसाळ्यात येथील निसर्ग सौंदर्याचा आनंद घेण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत आणखी वाढ होते. सध्या परिस्थिती अशी झाली आहे की, येथे अक्षरश: वाहानांची कोंडी झाली आहे. विशेषत: शनिवार रविवारीच्या सुट्टी दिवशी सिंहगडाला लोक आवर्जून भेट देतात. तुम्हीही जर शनिवारी-रविवारी सिंहगडाला भेट देण्याचा विचार करत असाल तर आधी हा व्हायरल व्हिडीओ बघा अन्यथा तुम्हालाही सिंहगडावर येऊन वाहतूक कोंडीत अडकावे लागेल.

हेही वाचा – ताम्हिणी घाट, लोणवळ्याची घटना ताजी असताना नवा व्हिडीओ चर्चेत! एका मिनिटांत धबधब्याचे पाणी कसे वाढते, पाहा Viral Video

इंस्टाग्रामवर foodexplorer_omi नावाच्या पेजवर हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. व्हिडीओमध्ये पर्यटकांची प्रचंड गर्दी पाहायला मिळत आहे. वाहतूक कोंडी झाली आहे. लोकांना चालण्यासाठी सुद्धा जागा नाही असे दिसते आहे. येथे एवढी गर्दी झाली आहे की, शनिवारी-रविवारी सिंहगडाला भेट देऊ नका असे सुचवण्यात आले आहे. व्हायरल व्हिडीओवर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

हेही वाचा –“मोत्यापेक्षा सुंदर अक्षर!”, दुसरीत शिकणाऱ्या चिमुकलीचं हस्ताक्षर ठरतोय चर्चेचा विषय, Viral Video एकदा बघाच

एकाने लिहिले, गड किल्ले पिकनिक पॉइंट झालाय नुसता. यांना इतिहासाचा पण माहित नसेल”
दुसरा म्हणाला, “शनिवार-रविवार किल्ले बंद करून टाका”
तिसरा म्हणाला, सिंहगडला पिकनिक स्पॉट करून टाकलयं”
चौथा म्हणाला, “प्रत्येकाकडून १००० रुपये घ्या प्रत्येकी, किल्ला संवर्धनाच्या कामाला येतील”
पाचवा म्हणाला, “झुणका भाकर केंद्र करून ठेवलय फक्त तिथे. किल्ल्याचं महत्व बाजूलाच राहील .”
आणखी एकजण म्हणाला,”शासनाने पावसाळ्यात खास करून शनिवार-रविवारी गड किल्ले स्वच्छता मोहीम हाती घ्यावी आणि पिकनिकला गडावर आलेल्या लोकांकडून गड स्वच्छ करून घ्यावेत.”

Story img Loader