जगाच्या पाठीवर अशी अनेक लोकं आहेत जे त्यांच्या वेगळेपणासाठी ओळखले जातात. आपली वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी लोक अनेक विचित्र गोष्टी करतात. असंच काहीसं एका जोडप्याने केलं आहे. त्यांनी त्यांची वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी संपूर्ण शरीरावर टॅटू काढून घेतले. त्यांनी त्यांच्या शरीराच्या काही भागावर नाही तर संपूर्ण शरीरावर टॅटू काढले आहेत. इतकेच नाही तर त्यांची शरीराचं बॉडी मॉडिफिकेशन देखील करून घेतलं आणि या जोडप्याने आपल्या शरीरामध्ये ९८ बदल करत आणि संपूर्ण शरीरावर टॅटू गोंदवत गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड (Guinness World Record) बनवला आहे.

नेमकं काय केलं ‘या’ जोडप्यानं?

Saif Ali Khan Attacked News
“मध्यरात्री २.३० वाजता…”, सैफ अली खानवर चाकू हल्ला झाल्यावर जवळच्या व्यक्तीचा खुलासा, सांगितला संपूर्ण घटनाक्रम
Pushpak train accident of karnataka express play horn may save life of many passengers
Jalgaon Train Accident : कर्नाटक एक्स्प्रेसच्या चालकाने भोंगा वाजवला…
Sadanand literary conference
सांगली: जात घट्ट कराल तसा माणूस पातळ होईल; लवटे
Premachi Goshta Fame Apurva Nemlekar dance on Rekha song in ankhon ki masti
Video: “इन आँखों की मस्ती…”, ‘प्रेमाची गोष्ट’मधील सावनीचं रेखा यांच्या गाण्यावर सुंदर नृत्य अन् अदाकारी, पाहा व्हिडीओ
raha kapoor and ranbir kapoor cute video viral
“Get Up Papa…”, राहाचे बोबडे बोल ऐकलेत का? धावताना धडपडली अन् बाबाजवळ जाऊन…; पाहा रणबीर-राहाचा गोड व्हिडीओ
Abdul Sattar
Abdul Sattar : अब्दुल सत्तार यांची मोठी घोषणा; “निवडणुकीत जात आणि धर्म आणला जातो, त्यामुळे यापुढे….”
nashik nylon manja loksatta news
नाशिकमध्ये एक लाखाचा नायलाॅन मांजा जप्त
Devendra Fadnavis and Sharad Pawar (1)
Sharad Pawar : बीडप्रकरणी शरद पवारांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना फोन; म्हणाले, “राजकारणात मतभेद असतील-नसतील, पण…”

अर्जेंटिनातील गॅब्रिएला आणि व्हिक्टर यांची भेट २४ वर्षांपूर्वी झाली. गॅब्रिएला आणि व्हिक्टर यांची एका मोटर सायकल कार्यक्रमात भेट झाली आणि दोघांचं आयुष्यच बदललं. तेव्हाच या दोघांचं पहिल्या नजरेत एकमेकांवर प्रेम जडलं. त्यांच्या लग्नाला १३ वर्ष पूर्ण झाली आहेत. हे जोडपं आपलं आयुष्य इतरांपेक्षा वेगळ्या प्रकारे जगतात.

(आणखी वाचा : विद्यार्थ्याचा कारनामा! ‘या’ पठ्ठ्याने उत्तरपत्रिकेत लिहिली चक्क प्रेमकथा अन् दुसरा निघाला ह्यापेक्षा वाढीव! कॉपी सोशल मीडियावर झाली व्हायरल )

या जोडप्याने आपल्या संपूर्ण शरीरावर टॅटू गोंदवले आहेत. डोळे आणि जीभेवरही त्यांनी टॅटू गोंदवले आहेत. व्हिक्टरने बॉडी मॉडिफिकेशन करत त्यांची जीभेचे दोन भाग केले आहेत, शिवाय कानाचा आकारही बदलला आहे. गॅब्रिएलानेही संपूर्ण शरीरावर टॅटू गोंदवले आहेत. गॅब्रिएला आणि व्हिक्टर या जोडप्याने आपल्या शरीरावर शस्त्रक्रिया करून वेगवेगळे बदल केले आहेत. गेली २४ वर्षे बॉडी मॉडिफिकेशन करण्यात त्यांनी घालवलं आहे.

व्हिक्टरने याबाबत प्रतिक्रिया देत म्हटलं आहे की, ‘माझ्यासाठी गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड धारक असणं हे माझ्या शरीरावरील कलेबद्दल आणि प्रेमाबद्दल मला मिळालेला पुरस्कार आहे.

Story img Loader