Delhi Metro Viral Video:दिल्ली मेट्रो नेहमीच कोणत्या कोणत्या कारणाने चर्चेत असते. कोणी मेट्रोमध्ये फॅशन शो करताना दिसते, तर कधी मेट्रोमध्ये डान्स करताना दिसते. कधी कोणी भांडण करताना दिसते तर कधी स्टंटबाजी करताना दिसते. दरम्यान अशाच एका व्हिडीओची सध्या चर्चा होत आहे.

दिल्ली मेट्रोमध्ये प्रवाशांमधील मारामारी आणि वादाचे व्हिडिओ दररोज सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. सध्या इंटरनेटवर एक व्हिडिओ वेगाने पसरत आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये महिला सीटसाठी मेल प्रवाशांशी भांडताना दिसत आहेत.

महिलांबरोबर जागेवरून जोरदार वादविवाद

ही घटना जनकपुरी पश्चिमेकडील ब्लू लाईनवर घडली, जिथे बॅकपॅक आणि इअरफोन घेऊन बसलेल्या एका पुरूषाचे महिलांच्या गटाशी जोरदार वाद झाले. वादात सहभागी असलेल्या एका महिलेने रेकॉर्ड केलेल्या फुटेजमध्ये, तो पुरूष मस्करी कर उत्तर देताना दिसतो.

खरं तर, गर्दीने भरलेल्या मेट्रोमध्ये एका महिला प्रवाशाने वारंवार विनंती करूनही, तो प्रवाशी त्याच्या सीटवर बसून राहण्याच्या निर्णयावर ठाम राहतो. महिला त्याला म्हणताना ऐकू येतात की, तू तरी मोठ्या मनाचा माणूस हो” पण काही क्षणांनंतर, तो शेवटी उभा राहतो, त्याने हार मानली म्हणून नाही, तर त्याला पुढच्या थांब्यावर उतरणार होता म्हणून तो उभा राहिला.

या व्हिडिओमुळे लगेचच ऑनलाइन वादविवाद सुरू झाला (This video immediately sparked an online debate)

व्हिडिओ बनवणाऱ्या महिलेने त्याला सांगितले, “भाऊ,तू आता व्हायरल होणार आहे. तू संपूर्ण डब्यात गोंधळ घातला आहेस. एकदा गप्प राहण्याचा प्रयत्न कर. थोडं मोठ्या मनाचा माणूस हो आणि काही शिष्टाचार दाखव.” पण, तो माणूस न घाबरता ट्रेनमधून उतरण्यापूर्वी प्रश्नार्थक स्वरात तिचे शब्द पुन्हा बोलून दाखवतो.

व्हिडिओमुळे लगेचच ऑनलाइन वादविवाद सुरू झाला. काही लोकांनी त्या माणसाचा बचाव केला आणि असा युक्तिवाद केला की सीट राखीव विभागात नाही आणि त्याला बसण्याचा पूर्ण अधिकार आहे, तर काहींनी त्याच्या वृत्तीवर टीका केली आणि म्हटले की तो अनावश्यकपणे भांडत आहे.

लोकांनी व्हिडिओवर अशा प्रतिक्रिया दिल्या (People reacted to the video like this)

एका वापरकर्त्याने कमेंट केली, “जर ही जागा महिलांसाठी नसेल तर ती का वाढवावी? समानता दोन्ही बाजूंनी काम करते!” दुसऱ्याने असहमती दर्शवत लिहिले, “मूलभूत सभ्यता म्हणजे ज्याला त्याची जास्त गरज आहे अशा व्यक्तीसाठी जागा सोडून देणे, मग ती महिला असो किंवा वृद्ध व्यक्ती.” तिसऱ्याने कमेंट केली, “ती त्याचे रेकॉर्डिंग का करत आहे आणि त्याला लाजवतेय? जर त्याला उठायचे नसेल तर ती त्याची इच्छा आहे.”

इतर लोकांनी त्या परिस्थितीत विनोद पाहिला, एकाने विनोदाने म्हटले, “वाह तो उभा आहे पण केवळ आपला मेट्रो स्टॉप आला म्हणून, भांडणामुळे नाही. दुसऱ्याने कमेंट केली की, कल्पना करा की, जर ही मुंबई लोकल असती तर कोणाला भांडण करण्यासाठी देखील एक सेंकड मिळाला नसता.

काहींनी मेट्रोमध्ये व्हायरल घटनांवर प्रश्नचिन्ह केले, ज्याबाबत म्हटले की, “प्रत्येक दिवशी दिल्ली मेट्रोमध्ये नवीन रिअॅलिटी शो सुरु असतो.”