सोशल मीडियावर कधी कोणता व्हिडीओ व्हायरल होईल हे सांगता येत नाही. बस किंवा रेल्वे प्रवासादरम्यानचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. ज्यामध्ये सीटवरुन काही लोकांमध्ये वाद झाल्याच्या अनेक घटना आपण पाहत असतो. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये दिल्लीतील DTC बसमध्ये दोन महिला सीटसाठी भांडताना दिसत आहेत. या महिलांची जोरदार भांडण पाहून अनेकजण थक्क झाले आहेत. तर काही नेटकरी या भांडणाची मजा घेताना दिसत आहेत.
सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्येही, डीटीसी बसमध्ये एक महिला लेडीज सीटवर बसलेल्या पुरुषाला उठायला सांगत आहे. मात्रत्या पुरुषाच्या शेजारी बसलेली महिला त्याला उठू न देता, उठायला सांगणाऱ्या महिलेशीच वाद घालायला सुरुवात करत असल्याचं व्हिडीओत दिसत आहे. या महिलांची भांडण पाहून बसमधील इतर प्रवासीही त्या व्यक्तीला तेथून उठायला सांगत आहेत. दरम्यान, या महिलांचा सीटवरुन वाद सुरु असताना त्याच बसमधून प्रवास करणाऱ्या अन्य एका प्रवाशाने आपल्या कॅमेऱ्यात ही सर्व घटना शूट केली. तो व्हिडीओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या घटनेचा व्हिडीओ Sumiti Choudhary नावाच्या फेसबुक अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे.
व्हिडिओमध्ये DTC बसमध्ये एक पुरुष महिलांच्या सीटवर बसला असून त्याला एक महिला उठायला सांगते. त्यामुळे पुरुषाशेजारी बसलेली महिला आणि उभी असलेल्या महिलेत वाद सुरु होतो. यावेळी उभी असलेली महिला त्या पुरुषाला ‘उठला नाहीत तर मी तुमची कॉलर पकडून तुम्हाला उठवेन हे चांगले दिसेल का?’ असं म्हणत त्या माणसाच्या शर्टला हात लावत असल्याचं दिसत आहे. अखेर त्या व्यक्तीला आपली जागा सोडावी लागते त्यानंतर हा वाद मिटल्याचंही पाहायला मिळत आहे.
हेही पाहा- अरे भाऊ लग्नाला यायचं की नाही? ‘ही’ व्हायरल लग्नपत्रिका बघून तुम्ही डोकंच धराल
व्हिडीओ व्हायरल –
हा व्हिडीओ शेअर करताना त्याच्या कॅप्शनमध्ये, ‘आज मी दिल्लीच्या DTC बसमध्ये २ महिलांना भांडताना पाहिलं, त्या दोघीही सीटसाठी भांडत होत्या, फ्री तिकिटाचा हा परिणाम आहे, तुम्ही व्हिडिओ पहा आणि कोणाची चूकी आहे ते सांगा.’ असं लिहिलं आहे. तर यावर नेटकरी वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. शिवाय हा व्हिडीओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून तो आतापर्यंत १ मिलियनहून अधिक लोकांनी पाहिला आहे. तर ४ हजारांहून अधिक लोकांनी या व्हिडीओवर स्माईल इमोजी रिएक्ट केली आहे. त्यामुळे हा व्हिडीओ पाहून अनेक नेटकऱ्यांचं मनोरंजन झाल्याचं पाहायला मिळत आहे.