शिक्षणाने माणूस खरच संस्कारित होतो का? असा प्रश्न समाजात अनेकदा उपस्थित केला जातो. याचं कारण म्हणजे सुशिक्षित लोकांमध्ये वाढत्या गुन्हेगारीच प्रमाण.गेल्या काही वर्षांपासून महिलांवरील विविध अत्याचारांत वाढ होत आहे. भर रस्त्यातही लोक आता घाबरत नाहीत. साहिल साक्षी हत्याकांड हे ताज उदाहरण आपल्या समोर असताना गुजरातमधून अक अत्याचाराचा व्हिडीओ समोर आलाय. हा व्हिडीओ पाहून तुम्ही म्हणाल अशा विकृतांना जागीच ठेचलं पाहिजे. हा व्हिडीओ सध्या व्हायरल होत असून या नरधामाला पलिसांनी चांगलीच अद्दल घडवली आहे.
गुजरातमध्ये वलसाड पोलिसांनी एका ऑटोरिक्षा चालकाला त्याच्या रिक्षात एका महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी अटक केली आहे. एका क्षुल्लक मुद्द्यावरून वाद वाढला आणि आरोपीने प्रवासी महिलेशी अयोग्य वर्तन करायला सुरुवात केली. आरोपी ऑटोरिक्षा चालकाने महिलेसमोर त्याच्या पँटची झिप उघडायला सुरुवात केली तसेच अतिशय असभ्य भाषेचा वापर केला. महिलेने याचा व्हिडिओ रेकॉर्ड केला. हा व्हिडिओ व्हायरल होताच पोलिसांनी कारवाई करत आरोपीला अटक केली. मिळालेल्या माहितीनुसार, आरिफ सय्यद असे आरोपीचे नाव आहे. नंतर त्याला महिलेची माफीही मागायला लावली. इथून पुढे असं कधीही करणार नाही अशी कबुली या आरोपीनं दिलीय
पाहा व्हिडीओ
हेही वाचा – Video: मगरींचा तलाव कधी पाहिलाय का? पठ्ठ्यानं थेट बोट चालवली, मात्र पुढच्याच क्षणी…
या ट्विटमध्ये दोन व्हिडीओ टाकले आहेत, या व्यक्तीचं आधीचं वर्तन आणि नंतरचं. हा व्हिडओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यावर नेटकरी अतिशय संतप्त प्रतिक्रिया देत आहेत. अशा नराधमांना लगेच शिक्षा दिली पाहिजे कारवाई झाली पाहिजे अशी मागणी नेटकरी करत आहेत.