अनेक भारतीय चाहत्यांसाठी क्रिकेटचा देव म्हणून सचिन तेंडुलकरची ओळख आहे. क्रिकेटमधून निवृत्ती घेऊन बरीच वर्ष उलटली असली तरी सचिनच्या खेळाची जादू जराही कमी झालेली नाही. आता दुसरीकडे चर्चा आहे, सचिन तेंडुलकर यांचा धाकटा मुलगा अर्जुन सचिन तेंडुलकरची. सध्या आयपीएलमध्ये अर्जुनच्याच नावाची चर्चा आहे. अर्जुन तेंडुलकर हा डाव्या हाताचा मध्यम वेगवान गोलंदाज आणि डाव्या हाताचा फलंदाज देखील आहे.आयपीएल ६३ वा सामना लखनऊ सुपर जायंट्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात होणार आहे. मात्र या सामन्यापूर्वीच मुंबई संघाची डोकेदुखी वाढवणारी बातमी समोर आली आहे.
मैदानात उतरताच दाखवली जखम
लखनौ – मुंबई इंडियन्सचा जलदगती गोलंदाज आणि मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरलाकुत्रा चावला आहे. विशेष म्हणजे स्वत: अर्जुननेच याबाबत माहिती दिली. लखनौ येथे ही घटना घडली आहे. लखनौ सुपरजायंट्सच्या ट्विटर अकाऊंटवरुन यासंदर्भातील एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. त्यामध्ये, अर्जुन स्वत:च, माझ्या हाताच्या बोटाला कुत्रा चावल्याचं सांगत आहे. मात्र, नेमका कोणत्या प्रकारचा कुत्रा चावला हे त्याने सांगितलं नाही.
अर्जुननेच दिली माहिती
हेही वाचा – सचिन तेंडुलकरने भेट दिलेल्या कोकणातल्या फार्म स्टेची झलक; दिवसाचे भाडे, जेवणाची सोय व पॅकेज जाणून घ्या
दरम्यान आजच्या सामन्यात अर्जुन तेंडुलकर लखनौ सुपरजायंट्सविरुद्ध खेळणार आहे की नाही? हे अद्याप स्पष्ट नाही. लखनऊ सुपरजायंट्सचा संघ ताज हॉटेलमध्ये थांबला असून रविवारी त्यांनी येथील अलटबिहारी वाजपेयी स्टेडियममध्ये सराव केला. तसेच मुंबई इंडियन्सचा संघही तिथेच आहे. त्यामुळे अर्जुनला कुत्रा हॉटेलमध्ये चावला असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सध्या ट्विटरवरील या व्हिडिओवरुन युजर्स अनेक प्रश्न विचारत आहेत.