IPL Arjun Tendulkar Viral Video: आयपीएल २०२३ मध्ये अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर २६ एप्रिल रोजी मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स (GT vs MI) यांच्यात सामना खेळला गेला. यात गतविजेत्या गुजरातने मुंबईचा ५५ धावांनी पराभव केला. या सामन्यातील एक व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे, ज्यामध्ये मुंबई इंडियन्सचा स्टार खेळाडू अर्जुन तेंडुलकर काहीसा किळसवाणा प्रकार करत असल्याचे दिसत आहे. भरमैदानात हजारो प्रेक्षकांसमोर सचिनचा लेक असं कसं वागू शकतो असा प्रश्न अनेकांना पडला होता. पण आज या व्हिडिओमध्ये नेमकं काय झालं होतं ते आपण पाहूया..

व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओत अर्जुन नाकात बोट घालताना दिसत आहे आणि मग तेच बोट तो तोंडात घालतो. पण मुळात त्याने आधी आपले नख चावले आणि नंतर बोट नाकात घातले. त्याचा हा प्रकार कॅमेरामनने आपल्या व्हिडिओत कैद केला.नंतर काहींनी अर्जुनचा हा व्हिडिओ इंटरनेटवर उलट करून शेअर केला आणि साहजिकच तो व्हायरल होऊ लागला. यानंतर काही फॅन पेजवर मूळ व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे.

Tula Shikvin Changlach Dhada
Video: “सूनबाई जर…”, भुवनेश्वरीमुळे अधिपतीला भेटण्याची अक्षराची इच्छा अपूर्ण राहणार का? मालिकेत पुढे काय घडणार?
Mulund renamed new Dharavi Dharavi redevelopment rehabilitation Mulund residents agitated boards
‘मुलुंडचे लवकरच नवीन धारावी नामांतर’, संतप्त मुलुंडवासियांकडून मुलुंडमध्ये…
Lagnanatr Hoyilch Prem
Video: ‘लग्नानंतर होईलच प्रेम’मधील काव्या व जीवाचा ‘लव्हयापा’वर डान्स; चाहते म्हणाले, “लय भारी”
Aata Hou De Dhingana Season 3
Video: ‘आता होऊ दे धिंगाणा ३’च्या मंचावर अद्वैतने कलासाठी आणली सवत; पतीला जिंकण्यासाठी कला लावतेय ताकद…; व्हिडीओ व्हायरल
Shiva
Video : “ही लग्नाची पत्रिका…”, शिवाला आशूच्या लग्नाचे आमंत्रण मिळणार अन्….; पाहा मालिकेचा प्रोमो
Maharashtrachi Hasyajatra Fame prithvik Pratap share funny video with wife
Video: पृथ्वीक प्रतापला बायकोला खोचकपणे मकरसंक्रांतीच्या शुभेच्छा देणं पडलं महागात, प्राजक्ताने थेट…; पाहा मजेशीर व्हिडीओ
Punha kartvya ahe
Video : “आता शिक्षेला…”, वसुंधरा व तनयाला जलसमाधी घ्यावी लागणार; ‘पुन्हा कर्तव्य आहे’मध्ये काय घडणार?
Shiva
Video: “माझा होकार…”, आशूने नेहाबरोबरच्या लग्नासाठी दिला होकार; ‘शिवा’ मालिकेत ट्विस्ट, पाहा प्रोमो

अर्जुन तेंडुलकर व्हायरल व्हिडीओ

अर्जुन तेंडुलकर मूळ व्हिडीओ

हे ही वाचा<< “सचिन तेंडुलकरमुळे १००९ धावा करणाऱ्या ‘त्या’ खेळाडूवर अन्याय…”अर्जुनचा फोटो लावून संतापजनक पोस्ट

दरम्यान, सचिन तेंडुलकरचा लेक म्हणजेच अर्जुन हा आयपीएल पदार्पणापासून चर्चेत आहे. अर्जुनने दुसऱ्याच सामन्यात आपल्या करिअरची पहिली विकेट घेतली . सनरायझर्स हैदराबाद (SRH) विरुद्ध अर्जुन तेंडुलकरने शेवटच्या षटकात पाच धावा दिल्या. मात्र, पुढच्या सामन्यात पंजाब किंग्जच्या फलंदाजांनी त्याला एकाच षटकात 31 धावा चोपल्या. व्हायरल व्हिडीओच्या सामन्यात त्याने गुजरातविरुद्ध एक विकेट घेतली होती.

Story img Loader