जरा का आपण जगप्रसिद्ध टीव्ही सिरीज FRIENDS पाहिली असेल तर तुम्ही आर्माडिलो (Armadillos) या प्राण्याविषयी ऐकून असालच. आर्माडिलो हा पाठीवर कासवांसारखं टणक कवच असलेला आणि खवल्या मांजर सारखं शरीर असणारा प्राणी आहे. ज्याचं तोंड हे सुसरीसारखं लांबुळकं असतं. अनेक प्राण्यांचं रिमिक्स व्हर्जन असलेल्या आर्माडिलोचा एक कमाल व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आपण कासवाला जसं आपल्या शरीराचा चंबू करून आपल्या पाठीवरील टणक आवरणात लपल्याचं पाहिलं असेल त्याच पद्धतीने हा भला मोठा प्राणी सुद्धा एक उडी मारून एखाद्या चेंडूसारखा गोलाकार होताना पाहायला मिळतोय. या व्हिडीओला ट्विटर वर १७ मिलियन व्ह्यूज आहेत.
आर्माडिलो शक्यताः आघात होत असल्याचे वाटताच अशा प्रकारे आपल्या आवरणात लपून जातात. त्यांचे हे आवरण कोणतेही बलवान प्राणी सुद्धा उघडू शकत नाहीत मात्र वाहनांच्या समोर हे आवरण काम करत नाही त्यामुळे वाहनाच्या अपघातात अशा प्रकारे लपणे हे फायद्याचे नाही.
पहा आर्माडिलोचा Viral Video
तज्ज्ञांच्या माहितीनुसार सद्य घडीला जगभरात २१ प्रजातींचे आर्माडिलो आहेत मात्र त्यातील एकमेव प्रजाती थ्री-बँडेड आर्माडिलो अशा प्रकारे स्वतःचे शरीर आवळून घेऊ शकतात. अन्य प्रजातीचे आर्माडिलो प्राण्यांच्या आघाताच्या प्रसंगी जमिनीत खड्डा खणून आपले मऊ पोट सुरक्षित ठेवतात.
आर्माडिलोच्या काही प्रजाती आकाराने प्रचंड मोठ्या असतात तर काही अगदी लहान असतात. शरीराने कितीही राकट वाटणारे हे प्राणी चक्क गुलाबी, लाल, पिवळ्या रंगांमध्येही पाहायला मिळतात. आर्माडिलोच्या सर्वात आवडीची गोष्ट म्हणजे झोप. नॅशनल जिओग्राफिक च्या माहितीनुसार हे प्राणी तब्बल १६ तास झोपतात व उर्वरित वेळेत सकाळ व संध्याकाळी अन्न शोधायला निघतात.
आर्माडिलोच्या या आवडी निवडी बघता अनेकजण त्याला आपला Spirit Animal म्हणून या व्हायरल विडिओ वर कमेंट करत आहेत. तुम्हालाही हे पटतंय का? कमेंट मध्ये कळवा.