आधार कार्ड हे प्रत्येक भारतीय नागरिकासाठी महत्त्वाचं कागदपत्र आहे. पण तुम्हाला माहितीये का आधार कार्ड आता फक्त व्यक्तीची ओळख पटवण्यासाठीच नव्हे तर कुत्र्यांची ओळख पटवण्यासाठी देखील होणार आहे. होय तुम्ही ऐकतायं ते सत्य आहे. आता फक्त व्यक्तीचे नाही तर कुत्र्यांचे ओळखपत्र तयार होणार आहे. मुंबई एअरपोर्टबाहेरील २० भटक्या कुत्र्यांना शनिवारी सकाळी ओळखपत्र म्हणजे आधार कार्ड देण्यात आले आहे, जे त्यांच्या गळ्यात बांधण्यात आले आहेत. यो ओळखपत्रर एक क्युआर कोड आहे जो स्कॅन केल्यानंतर संबधीत कुत्र्याबाबत प्राप्त माहिती मिळू शकते.
२० भटक्या कुत्र्यांना मिळाले क्युआर कोडवाले ओळखपत्र
टाईम्स ऑफ इंडियाच्या एका रिपोर्टनुसार, क्युआर कोडनुसार ओळखपत्र कुत्र्याच्या नावाचे , लसीकरण, नसबंदी आणि वैदयकीय तपशीलबाबत सर्व माहिती मिळेल. मुंबईच्या महानगरपालिकेने छत्रपती शिवाजी महाराज इंटरनॅशनल विमान उड्डानच्या टर्मिनल १ च्या बाहेर २० कुत्र्यांच्या एका गटाचे लसीकरण केले आणि त्यांच्या गळ्यात ओळखपत्र टाकले.
हा उपक्रम पाव प्रेंड (pawfriend.in) नावाच्या संस्थेने सुरू केली आहे. बीएमसीने या संस्थची मदत केली आहे आणि कुत्र्यांसाठी ही खास ओळख तयार केली आहे. या संस्थेच्या अक्षय रिडलॉनने सांगितले की ओळखपत्र गळ्यात बांधल्यानंतर आणि लसीकरण केल्यानंतर कुत्र्यांच्या पाठलाग करावा लागला.
हेही वाचा – कुत्र्यांपासून वाचवून बिबट्याच्या पिल्लांना शेतकऱ्याने नेले घरी, नाराज IFS अधिकारी म्हणाले….
भटक्या कुत्र्यांची मिळाली माहिती
तसेच क्युआर कोड असलेले ओळखपत्रामुळे बीएमसी शहराती भटक्या कुत्रे आणि इतर प्राण्यांची माहिती मिळवू शकते. त्याशिवाय पशुप्रेमी देखील आपल्या पाळीव प्राण्यांना हे परिधान करू शकतात. कारण ओळखपत्र हरवल्यानंतर ते पुन्हा मिळवण्यासाठी सोपे जाईल.
एनबीटीच्या वृत्तानुसार. या उपक्रमातंर्गत मुंबईच्या बांद्रामध्ये राहणाऱ्या सोनिया शेलार pd रोज साधारण ३०० भटक्या कुत्र्यांना अन्न देते तिची मदतही घेतली होती. तिने २० कुत्र्यांना एकत्र करण्याचे काम केले. सर्व प्रयत्नांमुळे २० कुत्र्यांना ओळखपत्र दिले गेले आहे.