Eagle vs Shark Video Viral On Twitter : इंटरनेटवर सिंह, वाघ, सापांसारख्या जीवघेण्या प्राण्यांचे व्हिडीओ नेहमीच व्हायरल होत असतात. पण गरुडासारख्या पक्षाचा व्हिडीओ समोर आल्यावर अनेकांच्या नजरा खिळतात. कारण तीक्ष्ण नजर असलेला हा पक्षी हजारो फूट उंचीवरून खोल समुद्रात उडी घेतो आणि मोठ मोठ्या माशांची शिकार करतो. गरूड पक्षाने छोट्या माशांची शिकार केल्याचे व्हिडीओ याआधी आपण पाहिले असतील. परंतु, आता व्हायरल झालेल्या या व्हिडीओने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. कारण गरुड पक्षाने चक्क समुद्रातील खोल पाण्यात असलेल्या शार्क माशावर नेम धरला आणि त्या माशाची शिकार केली. शार्क माशाला आपल्या पंजात अडकवल्यानंतर गरुड पक्षाने आकाशात उंच भरारी घेतली. हे सर्व थरारक दृष्य कॅमेरात कैद झाले असून व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

गरुडाचा हा थरारक व्हिडीओ @TheFigen नावाच्या ट्वीटर अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ शेअर करत कॅप्शनमध्ये म्हटलंय की, बापरे! शार्क माशाची शिकार! गरुडाचा शिकारीचा व्हिडीओ एका इमारतीच्या १७ व्या मजल्यावरून शूट करण्यात आला आहे. या व्हिडीओने इंटरनेटवर सर्वच नेटकऱ्यांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. हा व्हिडीओ व्हायरल होताच नेटकऱ्यांनी भन्नाट प्रतिक्रियांचा वर्षावही केला आहे. बेबी शार्क माशाची गरुडाने शिकार केली असल्याचं काही नेटकऱ्यांनी म्हटलं आहे. तर काहिंनी कॉंडर पक्षाने ही शिकार केल्याचं प्रतिक्रिया देत म्हटलं आहे.

नक्की वाचा – ‘हा’ आहे जगातील सर्वात लांब विमान प्रवास! विमानात प्रवाशांना किती तास बसावं लागतं? आकडा वाचून तुम्हीही व्हाल थक्क

इथे पाहा व्हिडीओ

एका नेटकऱ्याने म्हटलं, होली हेल, खूप सुंदर आणि खूप भयानकही..निसर्गाबाबत प्रेरणा देणारा एक व्हिडीओ. तर दुसऱ्या नेटकऱ्याने म्हटलंय, अरे देवा! या आठवड्यात मी पाहिलेली सर्वात सुदंर गोष्ट. तर अन्य एका नेटकऱ्याने म्हटलं, खरंतर ते मित्र आहेत, कारण गरुड शार्क माशाला छानपणे राईड देत आहे. इंटरनेटवर सापांचे, वन्य प्राण्यांचे अनेक थरारक व्हिडीओ पाहायला मिळतात. पण गरुड पक्षाने उंचावरून केलेली शिकार आणि त्यानंतर आकाशात घेतलेली भरारी असे दृष्य क्वचितच पाहायला मिळतात.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Around 27 lakh people stunned after watching eagle bird hunting a shark fish inside a sea eagle vs shark video clip viral on twitter nss