सोशल मीडियावर हजारो व्हिडीओ व्हायरल होतात. त्यामध्ये जास्त करून स्टंटचे व्हिडीओ असतात. काही व्हिडीओमध्ये तर इतके खतरनाक स्टंट केले जातात, की ते पाहून सर्वांनाच मोठा आर्श्चयाचा धक्काच बसतो. तरुणांनी वेगवेगळे थरारक स्टंट केलेले व्हिडीओ आवडीने पाहते. चालत्या वाहनांवर स्टंटबाजी करण्याची प्रटंड क्रेझ आजकाल तरुणांमध्ये वाढली आहे. काही लोक इतके जीवघेणे स्टंट करतात की पाहणाऱ्याच्या अंगावर काटा आल्याशिवाय राहत नाही.संधी मिळताच चित्रविचित्र स्टंट मारून लोकांचं लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करतात. पण ही स्टंटबाजी काही वेळेस अंगाशी सुद्धा येते. स्टंटबाजांना नको त्या ठिकाणी मार बसतो आणि आयुष्यभरासाठी अपंगत्व येतं. तर कधी कधी यांच्या चुकीमुळे इतरांचे बळी जातात, असाच एक धक्कादायक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ही घटना हरयाणातील गुरुग्राममधील असल्याचे कळत आहे. ही घटना रविवारी पहाटे दोनच्या सुमारास उद्योग विहार फेज-4 येथे घडली. सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेल्या या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये हे स्पष्ट दिसत आहे की फुटपाथवर काही लोकं आहे. तेव्हा रात्रीच्या अंधारात लांबून भरधाव वेगाने कार येताना दिसत आहे. या कारचा वेग पाहून लोक सैरावैरा पळू लागले आणि आपला जीव वाचवण्यासाठी एका कोपऱ्यात जमले. कारने टर्न मारताच तिच्या मागची बाजू जोरदार एका तरुणाला अदळली, ज्यामुळे हा तरुण गंभीर जखमी झाला.

एकाचा मृत्यू

नशीब त्या कारने तेथून टर्न मारला, नाहीतर तेथे असलेल्या सर्वच लोकांना दुखापत झाली असती. कारने ज्या तरुणाला धडक दिली, त्याने आपला जीव गमावल्या असल्याची माहिती मिळाली आहे.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा – किळसवाणा प्रकार! चक्क नाल्याच्या पाण्यापासून तयार करतायत बर्फ? VIDEO बघून पुन्हा हातही लावणार नाही

वारंवार अशाप्रकारच्या अपघातांचे व्हिडीओ व्हायरल होत असतात, मात्र तरीही तरुणाई यातून धडा घेताना दिसत नाही. नेटकरीही व्हिडीओ पाहून संतापले असून आरोपीवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.