सोशल मीडियावर विविध व्हिडीओ व्हायरल होत असतात. एकाचवेळी हजारो लोक सोशल मीडियावर व्हिडीओ पोस्ट करतात. पण यातील काहीच व्हिडीओ चर्चेचा विषय ठरतात आणि इंटरनेटवर धुमाकूळ घालतात. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर युजर्सचे लक्ष वेधून घेत आहे. ज्यात एक क्रिकेट चाहता आपल्या आवडत्या खेळाडूला एक खास सरप्राइज देत आहे. त्याचे हे सरप्राइज पाहून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. या चाहत्याने भारताचा स्टार खेळाडू विराट कोहली याचे एक हटके स्केच बनले आहे. यात आश्चर्याची गोष्ट म्हणजे,त्याने हाताने नाही तर चक्क जिभेने विराट कोहलीचे अचूक चित्र काढले आहे. त्याची ही कलाकारी पाहून अनेक युजर्सही अवाक् झाले आहेत. हा व्हिडीओ लोकांनाही खूप आवडला आहे.
व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक तरुण आपल्या आवडत्या क्रिकेटरचे स्केच बनवताना दिसत आहे. यावेळी तो सर्वप्रथम प्लेटमध्ये लाल रंगाची कोलगेट घेतो. यानंतर तो ती जिभेला लावतो आणि कॅनव्हासवर चित्र रेखाटण्यास सुरुवात करतो. अशाप्रकारे जिभेचा वापर करुन तो चक्क विराट कोहलीचे हुबेहुब चित्र काढतो.
विशेष म्हणजे तो न थांबता तो अगदी यशस्वीपणे हे चित्रे रेखाटतो. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर लोक कलाकाराचे खूप कौतुक करत आहेत. सौरभ विजय पटेल असे या कलाकाराचे नाव आहे. तो व्यवसायाने कलाकार आहे. त्याच्या इंस्टाग्राम हँडलवर असे अनेक व्हिडिओ आहेत. या व्हिडिओलाही आतापर्यंत तीन लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.
अशा प्रतिक्रिया लोकांनी दिल्या
व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ पाहून लोक आपापल्या प्रतिक्रिया देत आहेत. एका यूजरने लिहिले की, ‘मी पहिल्यांदाच अशी कलाकृती पाहिली आहे.’ आणखी एका युजरने लिहिले, ‘Amazing feat.’ त्याचवेळी दुसऱ्या यूजरने लिहिले की, ‘प्रत्येक व्यक्तीचे विराट कोहलीवर इतके प्रेम आहे.’