Fan Made Virat Kohli’s Art With His Tongue : टीम इंडियाचा हुकमी एक्का आणि जगातली नंबर वन क्रिकेटर म्हणून विराट कोहलीची ख्याती आहे. काही क्रिकेटप्रेमी कोहलीसाठी काहीही करायला तयार होतात. कारण कोहलीच्या एका जबरा फॅनने जीभेवर रंग टाकून त्याचं एक चित्र बनवलं आहे. या आर्टिस्टची कला पाहून यूजर्सने वेगवेगळ्या प्रतिक्रियांचा वर्षाव केला आहे. काही नेटकऱ्यांनी या तरुणाच्या कलेचं कौतुक केलं. तर काहींनी या कलेबाबत “अपमानजनक” असं म्हटलं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

@mufaddal_Vohra या ट्वीटर हॅंडलवर या कलाकाराचा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ पोस्ट केल्यानंतर सोशल मीडियावर तुफान गाजला आहे. आतापर्यंत या व्हिडीओला १.८ मिलियनहून अधिक व्यूज मिळाले आहेत. व्हायरल झालेल्या या पोस्टवर भन्नाट प्रतिक्रियांचा वर्षावही करण्यात आला आहे. एका यूजरने प्रतिक्रिया देत म्हटलं, या आगळ्यावेगळ्या रंगाचा वास कसा आहे. तर दुसऱ्या एका यूजरने कलाकाराचं कौतुक करत म्हटलं, “प्रतिभावंत मुलगा”. तसंच अन्य एका यूजरने म्हटलं, पेंटिंग चांगली दिसत आहे. पण ज्या पद्धतीने पेंटिंग करण्यात आलीय, ती पद्धत अत्यंत चुकीची आहे.

नक्की वाचा – क्रिकेटच्या पहिल्या समालोचनासाठी हर्षा भोगलेंना किती मानधन मिळालं? ४० वर्षांपूर्वीची ‘Payslip’ केली शेअर, म्हणाले…

इथे पाहा विराट कोहलीच्या पेंटिंगचा व्हिडीओ

यापूर्वी पाकिस्तानमधून विराट कोहलीच्या फॅन गर्लचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या व्हिडीओत फॅनगर्लने म्हटलं होतं, विराट कोहली माझा आवडता खेळाडू आहे. तरुणीने तिच्या गालांवर दोन्ही देशाचे झेंडे रंगवले होते. झेंडा दाखवताना ती म्हणाली, हा भारत आहे आणि हा पाकिस्तान आहे. तरुणीने व्हिडीओत म्हटलं, शेजाऱ्यांवर प्रेम करणं वाईट गोष्ट तर नाही ना…