Viral Video: दिवसभर ध्वनी अन् वायुप्रदूषणाचा सामना, तसेच आंदोलने, मोर्चे, धार्मिक कार्यक्रम अशा गडबड होण्याची शक्यता असलेल्या प्रत्येक संभाव्य ठिकाणी शहरात कायदा आणि सुवव्यस्था राखण्याच्या दृष्टीने वाहतूक नियमनाचे काम वाहतूक पोलीस करीत असतात. ड्युटीमध्ये वाहनचालकांना ट्रॅफिक नियमांची आठवण करून देणारे आणि रस्त्यावर विनाकारण वाहतुकीचा खोळंबा होऊ नये याची काळजी घेणारे वाहतूक पोलिस बिकट अवस्थेत काम करीत असतात. तर ही बाब लक्षात घेऊन, एका तरुणाने त्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणण्याचे ठरविले आहे. एका तरुणाने भरउन्हात उभ्या राहणाऱ्या वाहतूक पोलिसाला त्यांचे एक सुंदर चित्र रेखाटून दिले आहे.

व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ राजस्थानचा आहे. राजस्थानच्या रस्त्यावर वाहतूक नियंत्रण करणाऱ्या, दिवसरात्र मेहनत करणाऱ्या वाहतूक पोलीस अधिकाऱ्याला पाहून तरुणाला एक कल्पना सुचली आणि त्याने त्यांचे चित्र रेखाटण्याचे ठरविले. वाहनांचे नियंत्रण करणाऱ्या वाहतूक पोलिसांना पाहून, रस्त्याच्या कडेला उभे राहून तरुणाने त्यांचे चित्र रेखाटण्यास सुरुवात केली. तसेच त्याने केवळ चित्र काढून, ते स्वतःजवळच ठेवले नाही; तर ते संबंधित वाहतूक पोलीस अधिकाऱ्यांना जाऊन गिफ्ट म्हणून दिले देखील. भेटवस्तू दिल्यावर वाहतूक पोलीस अधिकारी यांचे हावभाव कसे होते ते व्हायरल व्हिडीओतून तुम्हीसुद्धा बघा…

हेही वाचा…रील्सच्या नादात हरपले भान; महिंद्रा थार घेऊन थेट गेले समुद्रात अन्…; थक्क करणारा हा व्हायरल VIDEO पाहाच

व्हिडीओ नक्की बघा…

व्हायरल व्हिडीओत तुम्ही पाहिले असेल की, कर्तव्यावरील वाहतूक पोलिस अधिकारी वाहने थांबवून, त्यांची तपासणी करीत आहेत. हे बघताच तरुण रस्त्याच्या कडेला उभे राहून चित्र रेखाटण्यास सुरुवात करतो. वाहतूक पोलीस अधिकाऱ्यांचा गणवेश, त्यांचा चष्मा, त्यांच्या चेहऱ्यावरील प्रत्येक हावभाव आदी गोष्टी बारकाईने पाहून, त्यांचे तो हुबेहूब चित्र रेखाटतो आणि त्यांना भेट म्हणून देतो. स्वतःचे चित्र रेखाटलेले पाहून त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद येतो. तसेच ते हे चित्र इतरांना आनंदाने दाखवितात आणि तरुणाला मिठी मारतात.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ @lavisheasy_art या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. अनेक जण व्हिडीओ पाहून, तरुणाच्या कलाकारीचे कौतुक, त्याने काढलेल्या चित्राची प्रशंसा करताना कमेंट्समध्ये दिसून आले आहेत. एकूणच सोशल मीडियावर या व्हिडीओने अनेकांचे लक्ष वेधून घेतले आहे.