आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त देशात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विविध माध्यमांतून शुभेच्छा दिल्या जात आहेत. या सगळ्यातच प्रसिद्ध वाळू कलाकार सुदर्शन पटनायक यांनीही ट्विटरवरून एक खास गोष्ट शेअर केली आहे; ज्यामध्ये त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवसाच्या खास शुभेच्छा दिल्या आहेत.
प्रसिद्ध वाळू कलाकार सुदर्शन पटनायक यांच्या ट्विटर अकाउंटवरून एक पोस्ट शेअर करण्यात आली आहे; ज्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसासाठी खास वाळूत कला सादर केली गेली आहे. भगवान विश्वकर्मा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे चित्र वाळूत चित्र रेखाटण्यात आले आहे. तुम्ही या व्हिडीओत बघू शकता की, पांढऱ्या रंगाची विविध चक्रे आणि त्यांच्या अगदी मधोमध पंतप्रधान नरेंद्र मोदी भगवान विश्वकर्मा यांच्यासमोर हात जोडत आहेत, असे दृश्य साकारले आहे.विविध रंगांच्या सजावटीद्वारे ही खास कलाकृती सादर करण्यात आल्याचे तुम्हाला दिसून येईल. सुदर्शन पटनायक यांनी या पोस्टमधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा कशा प्रकारे दिल्या हे एकदा तुम्हीसुद्धा व्हिडीओतून बघाच.
हेही वाचा… घनदाट जंगलामध्ये ३००० फुट उंचीवर विराजमान आहे ‘ही’ गणपती मुर्ती; व्हायरल होतोय व्हिडीओ
व्हिडीओ नक्की बघा :
पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी खास ट्विट :
सुदर्शन पटनायक हे प्रसिद्ध वाळू कलाकार आहेत. कला क्षेत्रातील त्यांच्या अतुलनीय योगदानाबद्दल त्यांना २०१४ मध्ये भारत सरकारने पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले होते. सुदर्शन पटनायक मूळचे ओडिशा राज्यातील आहेत. ते वाळूपासून अनेक कलाकृती बनवतात आणि अनेकांची मने जिंकत असतात.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७३ व्या वाढदिवसानिमित्त त्यांनी पुन्हा एकदा वाळूपासून तयार केलेली खास कलाकृती सादर केली आहे. पटनायक यांनी ओडिशाच्या पुरी बीचवर ही अनोखी कला सादर केली आहे. व्हिडीओतील खास गोष्ट अशी की, या खास कलाकृतीची झलक दाखवताना व्हिडीओ मागे तुम्हाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं भाषणसुद्धा ऐकू येईल.; जी अनेकांचे लक्ष वेधून घेत आहे.
प्रसिद्ध वाळू कलाकार सुदर्शन पटनायक यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारी ही पोस्ट @sudarshansand या ट्विटर अकाउंटवरून सादर केली आहे. या पोस्टला “भगवान विश्वकर्मा आपल्या माननीय पंतप्रधानांना देशाची सेवा करण्यासाठी दीर्घ आणि निरोगी आयुष्याचा आशीर्वाद देवोत”, अशी खास कॅप्शन देण्यात आली आहे.