निसर्ग सौंदर्याच्या कुषीत लपलेल्या नयनरम्य धबधब्यांवर मनमुराद आनंद लुटण्यासाठी हजारोंच्या संख्येत पर्यटक भेट देतात. भारतात रानावनात, डोंगर कपाडीत, झाडा-झुडपांत लपलेल्या धबधब्यांमुळं निसर्ग सौंदर्य आणखी खुलतं. पांढऱ्या शुभ्र दुधाप्रमाणे वाहणाऱ्या या धबधब्यांवर जाऊन स्नान करणं म्हणजे एक पर्वणीच असते. अरुणाचल प्रदेशच्या दिबांग घाटात असलेल्या अशाच एका सुंदर धबधब्याचा व्हिडीओ मुख्यमंत्री पेमा खांडू यांनी ट्विटरवर शेअर केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सीएम पेमा खांडू यांनी #dekhoapnapradesh अभियानाच्या अंतर्गत हा व्हिडीओ शेअर केला आहे. अरुणाचल प्रदेशच्या पर्यटन अर्थव्यवस्थेला अधिक बळकटी मिळण्यासाठी गतवर्षी हे अभियान सुरु केलं होतं. या धबधब्याचं मनमोहक सौंदर्य तुम्ही व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये पाहू शकता. हा व्हिडीओ इतका जबरदस्त आहे की तुम्ही पाहातच राहाल.

नक्की वाचा – बजाओ! भर लग्नमंडपात नवऱ्यासमोरच नवरीचा भन्नाट डान्स, Viral Video पाहून नेटिझन्स म्हणाले, “लग्नात अशीच नवरी…”

इथे पाहा सुंदर धबधब्याचा व्हिडीओ

सीएम पेमा खांडू यांनी व्हिडीओ शेअर करत म्हटलं, जर तुम्ही अनिनीला गेला नसाल, तर दिबांग घाटात निसर्गाच्या सौंदर्यात राहून नव्या वर्षाचं स्वागत करा. जावरू घाटातील निसर्ग सौंदर्य आणि इथली सुंदरता पाहून तुम्हाला विलक्षण आनंद होईल. यावर प्रतिक्रिया देताना एक नेटकरी म्हणाला, अरुणाचल प्रदेशचं सौंदर्य लाखमोलाचं आहे. दुसऱ्या नेटकऱ्यानं म्हटलं, अनिनी नाही पाहिलं तर काय पाहिलं…तर अन्य एकाने म्हटलं, काय सुंदर दृष्य आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Arunachal pradesh chief minister pema khandu shared spectacular video of dibang valley waterfall on twitter nss